सच्ची प्रीत ट्रस्ट पुणेच्या वतीने बाल दिन साजरा

13

जालना । येथील आदर्श बाल विकास उच्च प्राथमिक शाळा गांधीनगर येथे सच्ची प्रीत ट्रस्ट पुणे यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त बाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन खंदारे व सदस्य सुचिता नवगिरी तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती संगीताबाई खंदारे या होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक्स, कलर्स , टी शर्ट आणि फळे वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती कुहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ढाकणे, श्रीमती एस्थेर, वैशाली बाई यांनी परिश्रम घेतले.