जालना । भोकरदन येथील श्री गणपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिवाळी साजरी करताना फटाक्यांमुळे जखमी झालेल्या मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलास उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
भोकरदन येथील शुभम संजय कांबळे या १४ वर्षीय मुलावर पुण्याच्या ससुन रूग्णालयात उपाचार सुरु आहेत. आता त्याची तब्येत सुधारली असुन परंतु पुढील औषध उपचारासाठी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. श्री गणपती पतसंस्थेचे चेअरमन तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना ही बातमी कळल्यानंतर त्यांनी शुभमची आई रेखा कांबळे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. यावेळी जनविकास शिक्षण संस्थेचे संचालक इंद्रजित देशमुख, बँकेचे व्यवस्थापक अंकुश सुरासे यांच्या सह बँकेतील कर्मचारी उपस्थित होते.