वसतिगृह भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा

मराठा महासंघाचे शुभम टेकाळे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

30

जालना । डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्याची रक्कम शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही विद्यार्थ्यांना मिळाली नसून सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी अशी मागणी मराठा महासंघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम टेकाळे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

विद्यार्थ्यांच्या हितकारक मागण्यांबाबत  मंगळवारी (ता.15) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात शुभम टेकाळे यांनी म्हटले आहे, शिक्षणासाठी शहरात वास्तव्य करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  आधार देणारी असलेली योजना कोरोना काळा पुर्वी पर्यंत काटेकोर पणे राबविण्यात आली. तथापि सन 2021- 22 शैक्षणिक वर्ष उलटून गेले, ऑनलाइन पोर्टल वरील प्रस्तावांवर संस्थांनी त्यांचे कार्य केले मात्र संबंधित यंत्रणेने पुढील कार्यवाही न केल्याने संस्था पातळीवरच प्रस्ताव प्रलंबित आहेत. परिणामी भत्त्यापासून विद्यार्थी वंचित आहेत. असे नमूद करत शुभम टेकाळे पाटील यांनी यंदा अतिवृष्टी ने पिके उध्वस्त झाली असून आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांना रक्कम जमा करून दिलासा द्यावा. अशी मागणी शुभम टेकाळे पाटील यांनी केली आहे.