ज्येष्ठ नागरिकांनी लुटला दीपावली स्नेह मिलनाचा आनंद

23

जालना । ज्येष्ठ नागरिकांनी कौटुंबिक जवाबदारीतून थोडे बाजूला होत मिळेल तसे सामाजिक कार्यात विरंगुळा म्हणून वेळ द्यावा. असे प्रतिपादन नगरपरिषदेचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी धर्मराज खिल्लारे यांनी येथे बोलताना केले.

ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे सोमवारी ( ता.14) भाग्यनगर परिसरातील मराठा सेवा संघ कार्यालयाच्या सभागृहात दीपावली स्नेह मिलन व व्याख्यान संपन्न झाले. यावेळी मंचाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पायगव्हाणे, महासचिव डॉ.रावसाहेब ढवळे,कार्याध्यक्ष मोहन राठोड, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

” जेष्ठ नागरिकांसाठी प्रशिक्षण सुविधा ” या विषयावर मार्गदर्शन करतांना धर्मराज खिल्लारे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी घटनात्मक तरतुदी, मूलभूत सुविधा, संरक्षणात्मक कायदे या विषयी माहिती दिली.
प्रस्ताविकात मंचाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी जेष्ठ नागरिक हे राष्ट्राची संपत्ती असून त्यांचे ज्ञान, अनुभवाचा समाज घटकांना उपयोग व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना करण्यात आली असून याद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील. अशी भूमिका पायगव्हाणे यांनी स्पष्ट केली. ॲड. बलवंत नाईक,प्रा. राम भाले, श्री मेहेत्रे, सत्कारमूर्ती नंदकुमार पुंड, मोहन राठोड, शंकर सवादे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.मधुकर जोशी यांनी केले तर प्रा. राजकुमार बुलबुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते आर .आर.खडके, मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत ,काकासाहेब खरात ,वसंतराव कवडे, सी. ए.गोविंदप्रसाद मुंदडा ,बाबूराव सतकर ,ॲड. सोपानराव भांदरगे, के.बी.मिसाळ, रवीप्रसाद उजवणे, नरेंद्रकुमार जांगडे, दिगंबर पेरे,सौ. सुषमा पायगव्हाणे, सरिता जाधव, अनुराधा मिसाळ, संगीता खडके, भारती मोरे, मंगल खांडेभराड, यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवत वैचारिक आदान प्रदान केली , सोबतच फराळाचा आनंदही लुटला.