” व्हाईस ऑफ जालना ” राष्ट्रीय स्तरावर व्हावी : गौतमसिंह मुणोत

दुसरी फेरी: 78 स्पर्धकांची चाचणी

31

जालना । संगीत क्षेत्रात बॉलीवूड साठी संगीतकार, गायक निर्माण करणारी ” व्हाईस ऑफ जालना ” स्पर्धा केवळ जिल्ह्यापर्यंत सिमीत न राहता, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वरूपात करावी. स्पर्धेच्या आयोजनात आपण योगदान देणार असल्याची ग्वाही कुबेर ग्रुपचे संचालक गौतम सिंह मुणोत यांनी आज दिली.

जिल्हा सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित “व्हाईस ऑफ जालना”ची दुसरी फेरी सोमवारी (ता. 14) जे. ई .एस.महाविद्यालयात संपन्न झाली. दुसऱ्या फेरीच्या उद्घाटनप्रसंगी गौतम सिंह मुणोत बोलत होते. रायबा वस्ञदालनाचे संचालक मधुसूदन राठी, निवृत्त विक्रीकर अधिकारी श्रीकिशन विघ्ने, बॉलीवूड संगीतकार निलेश पतंगे, शैलेंद्र टिकारिया, परिक्षक राजेश जैस्वाल, मृणाली वाहने यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
गौतम सिंह मुणोत यांनी संगीत, क्षेत्रात शैलेंद्र टिकारिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दशकांपासून अनेक गायक, संगीतकार,घडले असून आपल्याला ही या क्षेत्राची आवड असल्याने त्यांच्या सोबत सदैव उभे राहणार असल्याचे मुणोत यांनी सांगितले.
बॉलीवूड संगीतकार निलेश पतंगे यांनी शैलेंद्र टिकारिया यांचे आपल्या सह पालकांना बहुमूल्य मार्गदर्शन, आणि सहकार्यानेच बॉलीवूड मध्ये काम करण्याची संधी मिळाली. असे स्पष्ट केले.
प्रास्ताविकात शैलेंद्र टिकारिया यांनी यंदा जिल्हाभरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच जिल्हा बाहेरील स्पर्धकांनी सुध्दा सहभाग देण्याची मागणी केली असे सांगितले. सुञसंचालन मिलींद दुसे यांनी केले तर सिध्दांत टिकारिया यांनी आभार मानले. दरम्यान निवड झालेल्या स्पर्धकांची उपांत्यपूर्व फेरी शनिवारी (ता.19) दुपारी 04.00 वा. भोकरदन नाका परिसरातील आय. एम. ए. हॉल येथे होणार असल्याचे संयोजकांनी कळविले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अभय नानावटी, अक्षय भुरेवाल, स्वरूपा पिपाडा हे परिश्रम घेत आहेत.