जालना । जागतिक मधुमेह दिनानिमित्त येथील ए. एम .डी .नर्सिंग संस्थेच्या वतीने जालना मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली.
सोमवारी ( ता. 14) संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजता आगार प्रमुखांच्या उपस्थितीत मधुमेह तपासणीस प्रारंभ करण्यात आला.
महिला, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, तरुण तसेच बालकांची तपासणी करून मधुमेह टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, उपचार, निदान याबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. सदर तपासणी शिबिरासाठी प्राचार्या शितल ढिल्पे, प्रा. निकिता आठवले, प्रा. शुभम हिवाळे ,प्रा. रवी राठोड, चंद्रकांत अर्जुने यांच्यासह कर्मचारी आणि नर्सिंग संस्थेच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. दुपारी दोन पर्यंत चाललेल्या या शिबिराचा 300 प्रवाशांनी लाभ घेतला.