जालना । सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या इन्नरव्हील क्लबच्यावतीने जालना रेल्वे स्टेशनसाठी दोन ट्रॉलींचे लोकार्पण करण्यात येऊन मुलींचा भार हलका करण्यात आला.
प्रवाशांचे सामान ने – आण करण्यासाठी रेल्वे स्थानकावर कुली हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. यावरच त्यांची रोजी रोटी अवलंबून असते. मात्र, या ठिकाणी ट्रॉलीची व्यवस्था पुरेशा प्रमाणात नसल्याने, त्यांची धावपळ होते आणि कमी वेळात पुरेपूर सेवा देता येत नसल्याने, किमान दोन ट्रॉली मिळाव्यात असा प्रस्ताव कुली असोसिएशनच्यावतीने इन्नरव्हील क्लब जालनाकडे देण्यात आला होता. त्या अनुषंगाने क्लबने दोन ट्रॉली तयार करून घेऊन या ट्रॉलीचे कुलीसाठी रेल्वे स्थानकावर देण्यात आल्याबद्दल कूली असोसिएशनने क्लबचे आभार व्यक्त करून आता आम्हाला अधिक प्रमाणात प्रवाशांच्या सामानाची चढउतार आणि ने-आण करणे सोपे होईल आणि कमाईही चांगली होईल, अशा भावना व्यक्त करून आभार मानले.
यावेळी क्लबच्या अध्यक्ष स्मिता चेचानी, सचिव स्वाती कुलकर्णी, अनुजा झंवर, प्रीती मल्लावत, सरला मुंदडा, पुष्पा चेचानी, सुनिता अग्रवाल, प्रीती मानधना विजयश्री बियानी, आदींची उपस्थिती होती.