जालना । कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ सोमवारी जालना शहरात आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पदयात्रेत नफरत छोडो-भारत जोडोच्या गगनभेदी घोषणांनी संपुर्ण शहर दुमदुमले. शहरातील प्रत्येक चौकात रॅलीचे जोरदार फटाक्याची अतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.
जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 14 नोव्हेंबर सोमवार रोजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11.30 वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा (मोतीबाग) पासून या भव्य पदयात्रेची सुरूवात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, युवानेते अक्षय गोरंट्याल, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, गटनेते गणेश राऊत, बाबुराव सतकर, युवक काँग्रेसचे ॲड. कुऱ्हाडे, चैतन्य जायभाये, राम सावंत, अशोक साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा. राहुल गांधी यांनी समाजामध्ये बंधुभाव, सामाजिक समरस्ता, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय राज्य घटना अबाधित रहावी यासाठी आणि देशामध्ये वाढलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी, शेतकरी कष्टकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, छोट्या व्यवसायीकांच्या समस्या व जिएसटी आदी प्रश्नांमुळे देशातील जनता होरपळुन निघत आहे. सर्व सामान्यांना न्याय मिळून देण्याबरोबरच सरकारला जागृत करण्यासाठी नफरत छोडो-भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत कुच करीत आहे. सदरील यात्रा महाराष्ट्र राज्यात सुरू असल्यामुळे खा. राहुल गांधी यांना समर्थन म्हणून सोमवारी शहरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुक्तेश्वर द्वारपासून दुतर्फा लोकांच्या रांगा दिसून आल्या प्रत्येक चौकात आ. कैलास गोरंट्याल यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. सदरील यात्रा गणपती गल्ली, शनिमंदीर चौक, गांधीचमन, मस्तगड, मुथा बिल्डींग, महाविर चौक मार्गे जावून या रॅलीचे मामा चौक येथे सभेत रूपांतर झाले.
या प्रसंगी देशाचे पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ. कैलास गोरंट्याल, प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा पवार यांनी आपल्या भाषणातून खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, ज्ञानदेव पायगव्हाणे, ज्ञानेश्वर भांदरगे, महाविर ढक्का, रमेश गौरक्षक, शरद देशमुख, राहुल हिवराळे, धर्मा खिल्लारे, मोहन इंगळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.