जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने विशेष मोहीम राबवा- सीईओ वर्षा मिना

22

जालना । केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा -2 नुसार 19 सप्टेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करणे बाबत सूचित केले आहे.या अनुषंगाने गावागावात स्वच्छता विषयक लोक चळवळ म्हणून विशेष मोहीम राबविण्यात यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी या प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे.
याबाबत असे की , गावागावात स्वच्छता राहावी,शौचालयाचा वापर व्हावा ,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानास गती यावी , व जास्तीत जास्त गावे हगणदारी मुक्त अधिक करणे आवश्यक असल्याने केंद्र शासनाच्या वतीने जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने दि 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान विविध प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
त्या एक खड्डा शौचालयाचे रूपांतर दोन खड्ड्याच्या शौचालयात करणे,सिटीजन अॅप्लीकेशन द्वारे प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा निपटारा करणे ,500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात मैला गाळ व्यवस्थापनसाठी चर उपलब्ध करून देणे,जास्तीत जास्त लोकांना शौचालय बांधकाम करनेस प्रवृत्त करून त्यांना अनुदान वितरित करणे,सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करणे,जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित करणे.घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापांचे कामे पूर्ण करणे, गोबरधन प्रकल्प कार्यान्वित करणे, गावात प्लॅस्टिक संकलन केंद्र सुरू करणे , नादुरुस्त शौचालयाची दुरूस्ती करून त्याचा वापर सुरू करणे, सांडपाणी व्यवस्थापन करणेसाठी शोष खड्डे निर्माण करणे आदि उपक्रमाचा समावेश असून गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी,ग्राम विकास अधिकारी, ग्राम सेवक यांच्या माध्यमातून सदरील मोहीम यशस्वी करावी असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
मोहिमेद्वारे ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेवून गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करणे, शौचालयाचे उदीष्ट्ये पूर्ण करण्या बाबतचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनुपमा नंदनवनकर करत आहेत.