जालना । लॉयन्स क्लब ऑफ जालना गोल्ड ग्रुप तर्फे मागील चार वर्षापासून अन्नछत्र प्रकल्प चालू आहे. या प्रकल्पाद्वारे स्त्री रुग्णालय जालना येथे दररोज सकाळी व संध्याकाळी रुग्णाच्या नातेवाईकांना जेवण देण्यात येते. सदर प्रकल्पाचे काम अखंडपणे चालू ठेवण्यासाठी सीताबाई आसारामजी उपाध्याय या श्रम घेत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल क्लब तर्फे माजी प्रांतपाल व मल्टी कौन्सिल हंगरचे चेअरमन विजयकुमार बगडिया यांच्या हस्ते शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. बगडिया यांनी त्यांच्या कार्याला नमन करून त्यांच्या अविरत सेवेबद्दल आभार मानले. यावेळी प्रांताचे हंगर व्हाईस चेअरमन लॉ. रामकुमार अग्रवाल, लॉ. रामदेव श्रुतीय ,लॉ.रमेश चंद्र अग्रवाल, लॉ. अशोक मिश्रा , लॉ. गोपाल उपाध्याय उपस्थित होते. लॉ. अशोक हुरगट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व उपस्थितांचे आभार मानले.