बालनाट्य महोत्सवाचे पडघम पुन्हा वाजतील : सुंदर कुँवरपुरियाँ

नाट्यांकुरतर्फे मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा

30

जालना । कोरोना परिस्थिती मुळे दोन वर्षांपासून मंदावलेला नाट्याकुर बालनाट्य महोत्सव, यंदा पुन्हा बहरणार असून नवीन कलाकृती नव्या अनेक विषयांसह मराठी रंगभूमीवर पुन्हा नव्याने उभारून येतील. असा विश्वास जेष्ठ रंगकर्मी, नाट्य लेखक,दिग्दर्शक तथा नाट्यांकुर चे सचिव सुंदर कुँवरपुरियाँ यांनी येथे बोलतांना व्यक्त केला.

मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात नाट्यांकुर बालनाट्य संस्थेच्या वतीने जागतिक मराठी रंगभूमी दिन शनिवारी ( ता. 05) उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात सुंदर कुँवरपुरियाँ बोलत होते. प्रकल्प प्रमुख आशीष रसाळ, जयेश पहाडे, रूपाली सेठ, अमित काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुंदर कुँवरपुरियाँ पुढे म्हणाले, स्व. विष्णू दास भावे यांची जयंती मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरी करत असतांना या ऐतिहासिक दिनी नव्या ने नाट्य संहिता लेखन, नाटक, अभिनयांच्या तालीम सुरू करणे अभिप्रेत असल्याचे नमूद करत सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या धुरिणांनी त्या सुरू कराव्यात. अशी अपेक्षा सुंदर कुँवरपुरियाँ यांनी व्यक्त केली.
प्रकल्प प्रमुख आशीष रसाळ यांनी बालनाट्य महोत्सव आयोजित करण्याबाबत नियोजन केले जात असून आगामी महिनाभरात याबाबत अध्यक्षांच्या परवानगीने घोषणा केली जाईल असे सांगितले.
रंगभूमी दिन व प्रकट दिनाचे औचित्य साधून सुंदर कुँवरपुरियाँ यांचे अभिष्टचिंतन आणि सत्कार करण्यात आला. सुञसंचालन रूपाली सेठ यांनी केले तर प्रकल्प प्रमुख जयेश पहाडे यांनी आभार मानले.