जिल्हाधिकारी यांची मानव विकास योजनेच्या उपक्रमांना भेट

110

जालना । अंबड तालुक्यातील रेवलगाव येथे दि.३ नोव्हेंबर रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी जयभीम शेतकरी गटाला भेट देऊन गटामार्फत खरेदी केलेल्या मानव विकास योजनेअंतर्गत मिनी अवजारे बँकेची पाहणी केली.

तसेच लखमापुरी येथील हरीयाली ग्रीन व्हेज प्रो.कंपनीला भेट देऊन कंपनी करत असलेले उपक्रमाची पाहणी केली.यावेळी लखमापुरी येथील रमेश तारगे यांची पोखरा योजनेअंतर्गत फळबाग लागवड पाहणी करून मार्गदर्शन केले .

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भिमराव रणदिवे,तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी,मंडळ कृषी अधिकारी हिवराळे,कृषी सहाय्यक पालवे,मुळक,आत्मा कर्मचारी श्रीमती व्हि.एच.खरात तसेच जयभिम शेतकरी गटाचे अध्यक्ष रोकडे,शेतकरी श्रीहरी काळे,आकर्षण तारगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.