जालना । येथील श्रेयांसनाथ दिगंबर जैन मंदिरापासून आज शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता जालना ते कचनेर 65 किलो मीटर अंतराची पायी यात्रा रवाना झाली असून, त्यात 30 श्रावक-श्राविका सहभागी झाल्या आहेत.
शेलगाव, बदनापूर , शेकटा, करमाड, पिंपरी, पिंपरी राजा मार्गे ही पायी यात्रा दिनांक 6 नोव्हेंबर रोजी कचनेर येथे पोहोचणार आहे. तेथे चिंतामणी पार्श्वनाथ बाबांचे दर्शन, अभिषेकानंतर भोजन करून हे श्रावक आणि श्राविका जालनाकडे प्रस्थान करणार आहेत. कचनेर ही जैन धर्मियांची काशी मानली जाते. कार्तिक पोर्णिमेला म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी येथे मोठी यात्रा भरते. देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रावक- श्राविका येथे दर्शनासाठी येतात. पार्श्वनाथ भगवान नवसाला पावतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कार्तिक पौर्णिमाला कमीत कमी 50 हजार श्रावक- श्राविका दर्शनासाठी येतात.
जालना ते कचनेर पायी यात्रेत संदेश लव्हाडे, विरेंद्र ठोले, राहुल गोधा, राजेश गोधा, सचिन गोधा, निकेत पहाड़े, अजय पहाड़े, शुभम महावीर पहाड़े, संदेश लव्हाडे, योगेश कासलीवाल, सौ. सरोज किशोर बाकलिवाल, सौ. दीपा अभय पाटनी, सौ. अमृता पीयूष कासलीवाल, सौ. हेमा अरुण कासलीवाल, सौ. वर्षा पंकज कासलीवाल, सौ. मोहिनी मंगेश कासलीवाल, सौ. तृप्ति लव्हाडे, सौ. दीपाली लव्हाडे, सौ. सोनल लव्हाडे, सौ. हेमलता कासलीवाल, सौ. टीना धीरज गंगवाल, सौ. रीना अतुल लोहाडे, सौ. रचना विशाल पाटनी, सौ. सुचिता गोधा, कु. श्रुति छाबड़ा, सौ. संगीता महावीर पहाड़े, कु. नेहा महावीर पहाड़े हे श्रावक आणि श्राविका सहभागी झाल्या आहेत.