धाकलगावाजवळ भरधाव कारची ऊस गाड्यांना धडक

दोन ऊसतोड कामगारांसह तीन बैल जखमी

18

जालना । अंबड तालुक्यातील जालना- वडीगोद्री महामार्गावर धाकलगावाजवळ भरधाव वेगाने जाणार्‍या कार क्र. एम. एच. 21 सी 3385 या कारने उस वाहतूक करणाऱ्या दोन टायर गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात 2 ऊसतोड कामगारांसह तीन बैल जखमी झाले आहेत. ही घटना आज शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली.

कारखान्याला टायर गाडीतून ऊस घातल्यानंतर टायर गाड्या आपल्या उस फड असणाऱ्या शहापूरकडे ऊस तोडणीसाठी जात होत्या. यावेळी दोन ऊस टायर गाड्यांना पाठीमागून येणार्‍या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मागून धडक दिली. जोराची धडक बसल्याने एक टायर गाडी रोडच्या खाली जावून पलटली, तर दुसर्‍या टायर गाडीचे चाक तुटून टायर निघून पडले. कारने दिलेल्या जोरदार धडकेत 3 बैल जखमी झाले असून, ऊसतोड कामगार ज्ञानेश्वर धोंडिबा शिंदे वय 40 वर्षे रा.शहापूर ता. अंबड, रामेश्वर कल्याण कापसे वय 42 वर्षे रा. दाढेगाव ता. अंबड हे दोघेही या अपघातात जखमी झाले. तसेच ऊस गाड्यांना धडक दिल्यानंतर कार देखील पलटी झाली, सुदैवाने कारमधील कुणाचीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे महामार्गावर गर्दी झाली होती. या अपघातात ऊस तोड कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे.