जालना । डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इंस्टिट्युट ऑफ पॉली अॅन्ड बुुध्दिझम धम्माचल या संस्थेच्या वतीने धम्माचल अजिंठा फर्दापूर ता. सोयगाव, येथे दि. 8 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा 17 व्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी जपान येथील भिक्खू ताईओ इनामाका हे राहणार आहेत. परिषदेची सुरुवात सकाळी 10 वाजता महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष धम्मसेवक महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करुन होणार आहे. तर उद्घाटक म्हूणन अमेरीका येथील भिक्खू लामा रंगड्रोल, धम्माचल स्मरणीका प्रकाशन इंग्लंड येथील भदन्त चंद्रबोधी महाथेरो यांच्या हस्ते होईल.
या परिषदेत भदन्त सुगतवंश महाथेरो, भदन्त शरणानंद महाथेरो, भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो, भदन्त बोधिपालो महाथेरो यांच्यासह भिक्खू संघाची प्रमुख धम्मदेसना होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, इंजि. अनिलकुमार गायकवाड राहणार आहेत. या परिषदेस बौध्द उपासकाने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, सचिव भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, उपासिका भारती हेरकर, कांताबाई रत्नपारखे, अनुराधा हेरकर, गयाबाई साळवे, प्रा. शोभा शिंदे, छाया हिवाळे, वंदना इंगळे, संजय हेरकर, भास्कर शिंदे, जी. आर. चिकटे, लक्ष्मण साबळे, प्रेमानंद मगरे, निखिल पगारे, तुकाराम सरदार, राजेश ओ. राऊत, दिलीप हिवाळे, मधूकर गायकवाड, रामेश्वर हिवाळे, प्रदिप घाटेशाही, राहुल प्रधान, विलास इंगळे, सुनिल गंगावने, एम. एच. सोनकांबळे, राहुल खिल्लारे, किरण सोनवणे आदिंनी केले आहे.
धम्माचल अजिंठा येथे कार्तिक पौर्णिमेस 17 वी बौध्द धम्म परिषद
देश विदेशातील बौध्द भिक्खू यांची राहणार उपस्थिती