तब्बल 36 लाख रुपये लुटण्याचा भामट्याचा प्लॅन; मात्र, कसा फसला ते पहा?

18

जालना । येथील औद्योगिक वसाहतीतील कालिका स्टील कंपनीस एका भामट्याने तब्बल 36 लाख रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीचा पूर्ण प्लॅन केला होता. मात्र, कंपनी मालक व अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सदरील प्रयत्न अयशस्वी झाला आहे.

याबाबत कालिका स्टील कंपनीतील लेखनिक आदित्य रमाकांत अंभोरे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 01/11/2022. रोजीचे 02.47 वाजता आरोपी मोबाईल क्र. 9580037980 धारक (नाव गाव माहीत नाही) याने कंपनीचे खाते असलेल्या बॅक ऑफ इंडिया शाखा शिवाजीनगर पुणे येथील बॅकेस यातील कंपनीच्या नावाने सही व स्टॅमसह कंपनीचे मालक Ghanshyam Goyal, Director, KALIKA STEEL ALLOYS PVT LTD RTGS.pdf असा बनावट ईमेल तयार करुन कंपनीचे चेक बुक संपले असल्याचे भासवुन सोशल मिडीयाचा वापर करुन कंपनीचे खात्यामधुन एकुण रक्कम रुपये 36लाख 43हजार 148 रुपये स्वतःच्या बनावट बॅक खात्यामध्ये पाठविण्याचे सांगुन फसवणुक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन पोलीस ठाण्यात कलम 420, 511 भादवी सह 66 क आयटी. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि. नाचण हे करीत आहेत.