जालना । येथील औद्योगिक वसाहतीतील गीताई कंपनीत मंगळवारी झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून 4 कामगार जखमी झाले आहेत. या प्रकरणी जखमी कामगार माहेश्वरी पांडे याच्या फिर्यादिवरून कंपनी मालक व भट्टी चालकावर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी माहेश्वरी अवदेश पांडे वय 30 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. छितोणा ता. अंनुमंडळ, हातुवा जि. गोपालगंज ह.मु. सुंदर नगर, चंदनझिरा यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 01/11/2022 रोजी सकाळी 11.50 वाजता फिर्यादी व साक्षिदार हे गीताई स्टील कंपनित कामादरम्यान आरोपी भट्टी मेंलटर अश्वीनी रॉय यांच्या निष्काळजीपणामुळे व कंपनी मालक लालाजी विश्वकर्मा यांनी कामगाराना सुरक्षा साधणे न पुरवल्यामुळे कंपनितील भट्टी क्रंमाक 02 एका बाजुने लिक होऊन मोठया प्रमाणात वाफ तयार झाल्याने फिर्यादी व इतर 04 कामगार गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या निष्काळजीपणामुळे कामगार अजयकुमार सिताराम राजभर याचा मृत्यू झाला आहे. अशा तक्रारीवरुन अश्वीनी रॉय (भट्टी मेंलटर) व कंपनी मालक लालाजी विश्वकर्मा यांच्या विरुध्द पो.स्टे. येथे गुरन 418/2022 कलम 304 अ, 337, 338, 287, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि श्री. सावळे हे करीत आहेत.