जालना । शारिरीक, बौद्धिक कसरत, कमी वेळात खर्चिक नसलेल्या मातीतील कबड्डी खेळाकडे संपूर्ण जग पुन्हा आकर्षित होत असून कबड्डीस उज्वल भविष्य आहे. वसुंधरा फाऊंडेशन ने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा घेऊन ग्रामीण भागात अव्वल दर्जाचे कबड्डीपटू घडवा .असे आवाहन कालिंका स्टील चे संचालक, उद्योजक घनश्यामदास गोयल यांनी केले.
मिशन 132 के. व्ही. अंतर्गत वसुंधरा फाऊंडेशन तर्फे कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या कबड्डी प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिरास मंगळवारी ( ता. 01) सायंकाळी घनश्यामदास गोयल यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यां सोबत संवाद साधला. यावेळी मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को- ऑप. बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, संचालक हेमंत ठक्कर,अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अनिकेत म्हात्रे,डॉ. केतन गायकवाड, ज्ञानदेव पायगव्हाणे
प्रल्हाद वाघ, लक्ष्मण पानखडे, वसुंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई पायगव्हाणे- काटकर, शिबिर प्रमुख प्रा. सुभाष देठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घनश्यामदास गोयल यांनी जालना जिल्ह्यात कबड्डी खेळाच्या विकासासाठी उद्योजकांचे सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
अंकुशराव राऊत म्हणाले, खेळाडू कन्येने माहेरच्या क्रीडा विकासासाठी उचलेले पाऊल नवी दिशा देणारे ठरेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेमंत ठक्कर यांनी प्रो कबड्डी लीग सामन्यांमध्ये देशातील मोठ्या उद्योगपतींनी गुंतवणूक केली असून कबड्डीस पुन्हा सुवर्ण काळ असल्याचे त्यांनी सांगितले.
मनिषाताई पायगव्हाणे- काटकर यांनी शिबिरात राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, सुरू असलेली बौद्धिक सञे,मैदानावरील सराव या विषयी माहिती दिली. सुञसंचालन संजय येळवंते यांनी केले तर शिबिर प्रमुख प्रा. सुभाष देठे यांनी आभार मानले. या वेळी सौ. सुषमाताई पायगव्हाणे, प्रशिक्षक बी. जे. पाटोळे, संतोष नागवे, राजाभाऊ थोरात, रवी ढगे, अंबादास गीते, दिनेश वाघ, विठ्ठल दिवटे, प्रदीप राठोड, अमोल पवार, गोपाल पायगव्हाणे यांच्या सह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.दरम्यान शुक्रवारी ( ता. 04) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप होणार असल्याचे आयोजकांनी कळविले.