जालना । जिल्हाधिकारी कार्यालयात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तहसिलदार संतोष गोरड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना संजय चंदन यांनी ‘राष्ट्रीय एकता दिवसा’ची शपथ दिली. या प्रसंगी नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, श्री. उन्हाळे, गजानन खरात आदींसह कर्मचारी उपस्थित होते.