जालना । सर्व जिवांत ईश्वर असून साधु,संत, दीन-दुबळे यांना अन्नदान दिल्याने ईश्वर भक्ती मिळते. मानव सेवेतच जीवन समर्पित करणारे आदर्शवत राष्ट्रसंत जलाराम बापा यांची 222 वी जयंती सोमवारी ( ता .31) जालना शहरात भक्ती भावाने व उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंत जलाराम बापा यांच्या जयंती निमित्त गुजराती लोहाना महाजन समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . सकाळी 09.00 वाजता बडी सडक स्थित शनिमंदिर परिसरात श्री. जलाराम सेवा मंडळातर्फे पूजन करून आरती करण्यात आली. सायंकाळी जून्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या रमण पल्स मिल येथे सामुहिक आरती, नामजप, भजन, तदनंतर नवीन औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या श्री .जलाराम मंदिर येथे नामसंकीर्तन, महाआरती जयघोष व महाप्रसादाने जयंती उत्सवाचा समारोप झाला. महिला,युवती, तरूण,जेष्ठांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.