जालना । काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेत सामील होण्यासाठी जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पूर्व तयारीसाठी दिनांक 2 नोव्हेंबर बुधवार रोजी येथील व्हीआयपी विश्रामगृह अंबड चौफुली येथे दुपारी 11.30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत जिल्ह्याचे प्रभारी माजी आ. नामदेवराव पवार प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, प्रदेश पदाधिकारी डॉ. संजय लाखे पाटील, आर. आर. खडके, कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष विविध आघाडीचे जिल्हाध्यक्ष आजी-माजी जि. प. व पं. स. सदस्य, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, गणेश राऊत, विजय चौधरी, राम सावंत आदींनी केले आहे.