जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असून त्यासाठी जिल्हा क्रिकेट असोशिएशन जालना तर्फे 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी रविवार (दि. 24) रोजी सकाळी 10 वाजता साई काणे अॅस्ट्रो टर्फ एमआरडी शाळेजवळ रोहणवाडी रोड येथे होणार आहे.
या निवड चाचणीसाठी 1 सप्टेंबर 2009 नंतर जन्मलेल्या खेळाडुंना सहभागी होता येणार आहे.
इच्छुक खेळाडुंनी येत्या रविवार (दि. 24) रोजी सकाळी दहा वाजता जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतिसह उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष Aअॅड. नरेंद्र देशपांडे, राजू काणे, अभिजीत चव्हाण व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संघ निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
सर्व खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह दिलेल्या तारिख व वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 9823373361 / 9922933138 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.