जालना । प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची काल जालन्यात जंगी सभा झाली आणि संपूर्ण वातावरण ढवळून निघाल्याने त्यात बदल झाल्याचेही जाणवत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असून तो कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करतांनाच ते म्हणाले की, विरोधकांना केवळ आपल्यावर टिका केल्याचे समाधान वाटत असेल तर वाटू द्या, त्यांना आपले नांव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, याचाच अर्थ मतदारराजा हा आपल्या बाजूने उभा आहे, त्यांचा आशिर्वाद हा धनुष्यबाणालाच मिळणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्ष व महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांनी विविध ठिकाणी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधला. श्री. अर्जुनराव खोतकर यांनी नुकत्याच जामवाडी, गोदेगांव, वंजार उम्रद, माळशेंद्रा, साळेगांव, शिवनगर, मयुर पार्क, सोरटी पार्क, कृष्णबन सोसायटीला भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना श्री. खोतकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची काल जालन्यात जंगी सभा झाली आणि संपूर्ण वातावरण ृढवळून निघाल्याने त्यात बदल झाल्याचेही जाणवत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असून तो कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करतांनाच ते म्हणाले की, विरोधकांना केवळ आपल्यावर टिका केल्याचे समाधान वाटत असेल तर वाटू द्या, त्यांना आपले नांव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, याचाच अर्थ मतदारराजा हा आपल्या बाजूने उभा आहे, त्यांचा आशिर्वाद हा धनुष्यबाणालाच मिळणार आहे. विद्यमान आमदाराने सत्तेवर असूनही कोणतीही कामे केली नाहीत. उलट आपण आणलेल्या कामांवर दावा केला जात आहे. मात्र वस्तुस्थिती लपून राहत नाही. आपण सत्तेवर नसतांनाही जालन्याचा पाणी प्रश्न मिटवला. मेडीकल कॉलेज जालन्याला आणले. परंतू विरोधी आमदार मात्र मी हे केले, ते केले, असे सांगत सुटले आहेत, हे त्यांना शोभेणारे नसले तरी आपले नांव घेतल्याशिवाय आणि आपल्यावर टिका केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, असे सांगून श्री. खोतकर म्हणाले की, महानगर पालिकेचा संपूर्णपणे बट्ट्याबोळ केला आहे. आपण सत्तेवर आलो तर संपूर्ण कामगार सुधाण्यात येईल. पाणी सुध्दा आपण आणले मात्र हा भामटा स्वत:ला जलसम्राट म्हणून घेत आहे. पदवी ही लोकांनी द्यायला हवी. स्वत:तर कोणीही जलसम्राट म्हणून मिरवेल, असे सांगून ते म्हणाले की, राज्यातले रस्ते, आरोग्य सेवा, परिवहन सेवा, पाणी व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, शेतकर्यांचे शेती विषयक योजना, वयोवृध्द मंडळींना वयोश्री योजना, महिला साठी दरमहा पंधरा रुपये या सर्व योजना महायुती सरकारने राबविल्या आहेत. त्यामुळे देते देशातील पहिले सरकार ठरले आहे. आपले कोणतेही काम असू द्यात ते मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही शेवटी श्री. खोतकर यांनी दिले.