दत्ता देशमुख
टेंभूर्णी – देशात आणि महाराष्ट्र मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाली आहे. त्यामध्ये अध्यापक आणि एका वर्षात 50 तासांचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. या संदर्भात शासनाकडून नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना च्या वतीने, इयत्ता पहिली ते बारावी नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण राबविण्यात आले. जवळपास 370 हून अधिक शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केलेल्या सगळ्या विषयांचा समावेश होता, ज्यात शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, शालेय अभिलेखे सेवा शर्ती व नियमावली, विद्यार्थी लाभाच्या योजना, बहुत स्तरीय व बहुवर्ग अध्यापन पद्धती, अध्यापन पद्धतीची स्वायत्तता, अध्यापनास स्थानिक भाषेचा वापर, कला क्रीडा अनुभवातील एकात्मिक शिक्षण, वयानुरूप समक्ष वर्गात प्रवेश, मुलींचे शिक्षण, प्रारंभिक बाल्यावस्था व प्राथमिक शिक्षण, अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन व अध्यापनांचे मूल्यमापन, अध्ययन अध्यापन वावर आधारित मूल्यमापन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, अध्ययन अध्यापनाचे अध्ययनाचे हेच मूल्यमापन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ओळख, बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम 2009, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012, बहुविध बुद्धिमत्ता सामाजिक आणि भावनिक अध्ययन, 21 व्या शतकातील कौशल्य साक्षरता कौशल्य, भविष्यवेधी शिक्षण जीवन कौशल्य, शाश्वत विकासाची ध्येय,सामाजिक न्याय व समता, बाल हक्क संरक्षण, भविष्यवेधी शिक्षण वातावरणातील बदल, माहिती तंत्रज्ञानातील कौशल्य व तंत्रज्ञान, शालेय स्पर्धा परीक्षा, निपुण भारत अभियान, नवोपक्रम व कृती संशोधन, प्रकल्प केस स्टडी, तान तणावाचे व्यवस्थापन,आपत्ती व्यवस्थापन, शाळा स्तरावरील समित्या, विविध व्यासपीठ व संसाधन चा वापर, विविध शिक्षण संस्थांचा अभ्यास, नवनियुक्त शिक्षकांसाठी संदर्भ साहित्याचा वापर, व्यावसायिक अध्ययन समूह,या सर्व अभ्यास विषयावर, जालना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, राजेंद्र कांबळे, श्रीहरी दराडे, डॉक्टर कुमावत, संजय येवते, योगेश्वर जाधव, डॉक्टर सूर्यवंशी, उपप्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख, प्राध्यापक डॉक्टर आनंद जाधव, ढाकणे के व्ही, प्रा.महेश लाहोटी, निलेश जोशी, जयंत कुलकर्णी, डॉक्टर रूपाली नामेवार, विवेक कुलकर्णी,संतोष देशपांडे, बालाजी मदन, श्रीमती नरवडे, श्री सोल्हाटे, श्रीमती मीरा जगदाळे, श्री दीपक दराडे, श्रीमती निलोफर पटेल, श्रीमती सुजाता भालेराव, श्री वसीम पटेल, श्रीमती मनीषा पाटील, दादाभाऊ जगदाळे, डॉक्टर करुणा हिवाळे, श्रीमती प्रेरणा मोरे, श्री हरिभाऊ निकम,श्री महेश चौधरी, देविदास आठवे, सय्यद अख्तर, मंथजी ढाकरे, आशाताई मगरे,श्रीमती कल्पना पाटील, श्री मिसाळ,,श्री गव्हाड, श्री गायकवाड, आदी रिसोर्स सुलभकांनी व्याख्याने दिली. समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र कांबळे होते.विशेष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य विजयराव शिंदे हे होते. सोबत जालना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्राध्यापक सुलभकांमध्ये केवी ढाकणे, उपप्राचार्य प्राध्यापक दत्ता देशमुख. यांची उपस्थिती होती. विजय शिंदे यांनी सांगितले किं शिक्षक आणि शिकवताना विद्यार्थ्यांचे अध्ययनाचे संबोध लक्षात घेतले पाहिजे. ज्या शिक्षकांनी संबोध लक्षात आले त्यांचा अध्यापन उत्कृष्ट दर्जाचा होईल. तसेच विद्यार्थी हा विविध स्पर्धा परीक्षा टिकेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांनी विविध मुद्द्यांनी ते समजावून सांगितले. तसेच अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर राजेंद्र कांबळे यांनी शिक्षकांनी शिस्तबद्ध पद्धतीने हजेरी लावली आणि समाधानकारक प्रशिक्षण घेतले त्याबद्दल सर्व प्रशिक्षणार त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी हे सांगितले की आमच्या सर्व सोलबकांनी सर्व शिक्षकांना योग्य पद्धतीने ज्ञान दिले. त्याचबरोबर ते पुढे असे म्हणाले की शिक्षणातील आव्हान आपण समजावून घेतले पाहिजे आणि त्या आव्हानाला सामोरे गेले पाहिजे. दोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आव्हाने यावर भर दिला असून भविष्यात विद्यार्थ्याला अनेक कौशल्य विकसित करता आली पाहिजे ही थीम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असल्याने व तसेच वर्षभरात 50 तासांचे प्रशिक्षण शिक्षकांना बंधनकारक असल्याने शिक्षक आणि प्रशिक्षण घेतलेच पाहिजे तरच नवीन बदल शिक्षकांना कळतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनियुक्त शिक्षकांमधील शिक्षकांनी केले आणि आभार प्रदर्शन सुद्धा त्यांनीच केले.