बंजारा समाज मोठ्या ताकदीने आ. लोणीकरांच्या पाठीशी धर्मगुरू पोहरादेवी गडाचे महंत बाबुसिंग महाराज यांनी परतुर-मंठ्याचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना दिले आशीर्वाद

5

परतुर । प्रतिनिधी – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्री व आमदार असताना बंजारा समाजातील तांडे आणि वस्त्यांवर विकासाची गंगा आणली आहे. बंजारा समाजावर लोणीकर परिवाराने प्रत्येक वेळेस भरभरून प्रेम केले आहे. यावेळी आपण त्या प्रेमाची परतफेड म्हणुन मतदारसंघातील असलेल्या बंजारा समाजाची एक गठ्ठा मतदान लोणीकर यांना द्यावे असे आवाहन बंजारा समाजाचे धर्मगुरू पोहरादेवी गडाचे महंत बाबुसिंग महाराज यांनी केले आहे.
यदलापुर येथील वरद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात बोलताना धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांनी सांगितले की, गेल्या 75 वर्षांमध्ये पोहरागडावर एकही पंतप्रधान आले नाही. मात्र देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरागडाच्या विकासासाठी करोडो रुपयाचा निधी देऊन बंजारा समाजाला न्याय दिला आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीचे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माजीमंत्री आ. बबनराव लोणीकर यांना बंजारा समाजाने येत्या निवडणुकीत भरभरून मते देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी समाज बांधवाला केले. मंठा परतूर विधानसभेत बंजारा
समाज या कोणासोबत आहे? हे कोणत्या ज्योतिषाकडे विचारण्याची गरज नसुन आजच्या पोहरादेवी येथील महंत बाबू सिंग महाराज यांच्या मेळाव्यावरून स्पष्ट दिसून येते की, जास्तीत जास्त बंजारा समाज हा आमदार बबनराव लोणीकर यांच्याच पाठीमागे असल्याचे दिसून आले, यावेळी मतदारसंघातील बंजारा समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.