परतूर । प्रतिनिधी – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लागणार्या ईव्हीएम तसेच व्हिव्हीपॅट यंत्राची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया रविवारी दि.10/11/2024, रोजी निवडणूक निरीक्षक श्री. नवीन, निवडणूक निर्णय अधिकारी, पद्माकर गायकवाड.सहाय्यक निवडणूक अधिकारी, डॉ. प्रतिभा गोरे.लक्ष्मीकांत खळीकर.उमेदवार प्रतिनिधी, यांच्या प्रमुख उपस्थितीत जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्ट्राँग रूम कक्षात पार पडली.
निवडणूक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार 99 परतूर विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 359 केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नोटासह एकूण 12 उमेदवार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी 430 सी.यु.(कंट्रोल युनिट), 430 बी.यु. (बॅलेट युनिट) व 466 व्हिव्हीपॅट यंत्र प्राप्त झाले आहेत.
रविवारी झालेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेत एकूण 359 मतदान केंद्रासाठी प्रत्येक केंद्रावर एक संच याप्रमाणे सरमिसळ करून उमेदवार तसेच उमेदवार प्रतिनिधीना सरमिसळ प्रक्रियेची हार्ड कॉपी देण्यात आल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.