माझा विजय आणि राज्यात युतीचे सरकार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ – अर्जुनराव खोतकर; विराट रॅलीद्वारे खोतकर यांना निवडून देण्याचा जालनेकरांचा निर्धार

5
NIKHIL CHOURAWAR

जालना*  – जालना विधानसभेतील आपला विजय आणि राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचा ठाम विश्वास शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.  मामा चौक ते  भाग्यनगर अशी महारॅली काढून महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी आपले नामांकन पत्र सादर केले. यावेळी महा रॅलीच्या समारोपप्रसंगी बोलताना श्री. खोतकर म्हणाले की, मी कोणत्याही पदावर नसताना शहरातील वार्डा वार्डात आणि ग्रामीण भागातील प्रत्येक गावात विकास कामे सुरू आहेत.  सुमारे साडेतीनशे कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जालना मतदार संघाच्या विकास कामांसाठी दिले आहेत.  महिलांसाठी तर मुख्यमंत्र्यांचे धोरण अत्यंत उदार आहे. मुलीचा जन्म होताच खात्यावर पाच हजार रुपये टाकले जातात. पंधरा वर्षाची झाल्यावर एक लाख एक रुपये जमा होतात. पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या लाडकी बहीण सारख्या खूप योजना महिलांसाठी सुरू केल्या आहेत.  शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा, सौर ऊर्जा प्रकल्प, मोफत वीज, केंद्र सरकार प्रमाणे राज्याकडूनही शेतकऱ्यांना सहा हजाराची मदत दिली जाते.  विविध प्रकारचे अनुदान दिले जात आहेत.  माझ्या 35 वर्षातील राजकीय कारकिर्दीत मी असा लोककल्याणकारी मुख्यमंत्री पाहिलेला नाही.  त्यामुळेच विधानसभेवर भगवा फडकणार आहे. जालन्यात आपला विजय होणार आहे.  ही निवडणूक म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीमच आहे. विधानसभेनंतर येणाऱ्या पालिका आणि जिल्हा परिषदेवरही भगवा फडकविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. *फेकू आमदाराला फेका!*              आपला विरोधी उमेदवार आमदार हा निष्क्रिय आहे.  मी आणलेल्या सर्व योजनांचे ते श्रेय घेतात. आजपर्यंत ते कधीही विकास कामावर निवडून आलेले नाहीत. फक्त माझ्याबद्दल उर्मट भाषेत बोलणे, माझी बदनामी करणे, खालच्या पातळीवर टीका करणे एवढेच त्यांचे काम आहे. टक्केवारीसम्राट, मद्यसम्राट अशी फेकाफेकी करणाऱ्या या आमदाराची ओळख आहे.  शेरोशायरीने विकास होत नसतो. त्यामुळे सुज्ञ आणि समंजस जनतेने यावेळी फेकाफेकी करणाऱ्या या आमदाराला कायमचे फेकून देण्याचे ठरविले आहे. यावेळी लढेंगे और जितेंगे, जो असेल दमदार, तोच होईल आमदार अशा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

भावासाठी भाऊ धावून आल्याने हत्तीचे बळ मिळाले

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी यावेळी सांगितले की, श्रीरामासोबत लक्ष्मण आणि कृष्णासोबत बळीराम होता म्हणूनच राक्षसांचा नायनाट झाला आणि सत्याचा विजय झाला. मला तिकडं (उबाठा) करमत नव्हतं… भाऊ आले आणि कामाला लाग म्हणाले… क्षणाचाही विचार न करता आपण सहभागी झालो… 35 वर्षापासून शिवसेना हाच आपला परिवार आहे. अर्जुनरावांनीच या मतदारसंघात विकासकामे केलेली आहेत.  पण केवळ विकासच नव्हे तर सर्वांच्या सुखदुःखात अहोरात्र धावून जाणारे भाऊच आहेत. त्यामुळे तेच आमदार होण्याची खरी आवश्यकता आहे. आपण ग्रामीण भागाची सूत्र हाती घेऊन कामाला लागणार असल्याचे अनिरुद्ध खोतकर यांनी यावेळी स्पष्ट केले.  या अनुषंगाने बोलताना अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या भाषणात भावासाठी भाऊ धावून आल्याने आपल्याला हत्तीचे बळ मिळाले असे स्पष्ट केले.   यावेळी एद. ब्रह्मानंद चव्हाण यांनी सांगितले की, एकही खासदार रिपाईचा निवडून आलेला नसताना आमचे नेते रामदास आठवले यांना मंत्रिपद देण्यात आले. आमचा पक्ष आणि समाज अर्जुनराव खोतकर यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे.

भाजपच्या पदाधिकारी कमल तुल्ले म्हणाल्या की, अर्जुनराव खोतकर हेच सर्व महिलांचे पाठीराखे आहेत. संकटात साथ देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी या शहरात सर्वांनीच उभे राहण्याची खरी गरज आहे.  वीरेंद्र धोका म्हणाले की, महायुतीचे सरकार येणार असून यावेळी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवाराकडे न पाहता युतीलाच मतदान करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अर्जुनरावांचा विजय निश्चित झाला आहे. यावेळी भाऊसाहेब घुगे म्हणाले की, अठरापगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी अनेक गड जिंकले. अर्जुनराव खोतकर हेही अठरापगड जातीला सोबत  घेऊन चालणारे नेतृत्व आहे. त्यामुळे जालन्याचा गड आम्ही  जिंकल्याशिवाय राहणार नाही.  अश्फाक भाई म्हणाले की, जालन्यात काँग्रेस आहेच कुठे? जी आहे ती कैलास गोरंट्याल लिमिटेड कंपनी आहे. यावेळी अभिमन्यू खोतकर, दर्शना खोतकर झोल, विष्णू पाचफुले, दीपक वैद्य आदींची जोरदार भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी विजयी रॅली, विजयी सभा असा आपल्या भाषणात उल्लेख केला. यावेळी हे.

विधानसभा संपर्कप्रमुख माजी खासदार हेमंत गोडसे, ऍडवोकेट ब्रह्मानंद चव्हाण, फिरोज लाला तांबोळी , भारतीय जनता पार्टीचे वीरेंद्र धोका सौ कमलताई कुल्ले,बाबासाहेब इंगळे,  अनिरुद्ध खोतकर संपर्क पंडितराव भुतेकर, अभिमन्यू खोतकर ,जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आत्मानंद भक्त एडवोकेट भास्कर मगरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालींदा ढगे सविताताई केवंडे संतोष राव मोहिते लहुजी शक्ती सेना युवक प्रदेशाध्यक्ष सचिन शिरसागर गणेशराव सुपारकर उज्वलाताई फोपलीया, असपाक पठाण युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर अजय कदम उपजिल्हाप्रमुख गणेश मोहिते तालुका प्रमुख भगवान आंभोरे युवा सेना तालुकाप्रमुख राहुल गवारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.