परतूर । प्रतिनिधी – महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक खोट्या नाट्य गोष्टी सांगून देशात सह महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली व त्या माध्यमातून लोकसभेला अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामध्ये भाजपा सत्तेत आली तर आरक्षण संपवून टाकेल आणि राज्यघटना बदलून टाकतील अशा चुकीच्या गोष्टी प्रामुख्याने सांगण्यात आल्या परंतु त्यांचे नेते देशाबाहेर गेल्यानंतर आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण संपवू असं बोलतात त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते खोट्या गोष्टींचा अपप्रचार करतील त्यांना बळी न पडता परतुर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार्या माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन राज्याचे वन व सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले
परतुर येथे आज आमदार बबनराव लोणीकर यांच्या नामांकन अर्ज भरण्यानिमित्त आयोजित महा विराट रॅली च्या समारोपप्रसंगी श्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते यावेळी मंचावर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट रयत क्रांती संघटना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री बबनराव लोणीकर माजी आमदार श्री विलासराव खरात भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री राहुल लोणीकर आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री ओमप्रकाश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना श्री मुनगंटीवार म्हणाले की कुठल्याही परिस्थितीत कोणताही व्यक्ती देशाची राज्यघटना बदलू शकत नाही परंतु ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला राज्यघटनेतील विचारांची पायमल्ली केली तेच लोक आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर राज्यघटना बदलणार असल्याचा आरोप करत आहेत त्यांना तोडीस तोड उत्तर देत त्यांनी पसरविलेले फेकणारे ठेव हाणून पाडण्याची जबाबदारी प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यावर असल्याचे देखील यावेळी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आज जगातील महत्त्वाच्या व निर्णय प्रक्रियेतील राष्ट्र बनले आहे संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्वात भारत करत आहे अशा परिस्थितीत देशाला अधिकाधिक प्रगतिशील बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र देखील भाजपा महायुतीचे सरकार असणे आवश्यक आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रयत्न करत असून आपणही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता निवडणे आवश्यक आहे असे यावेळी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून कर्तबगार मंत्री आणि मग मागील पंचवार्षिक मध्ये अनुभवला असून यापुढे देखील पुन्हा एकदा केवळ आमदार नव्हे तर मंत्री निवडून देण्याची संधी तुम्हा सर्वांना आहे अशा शब्दात बबनराव लोणीकर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात आपल्याला दिसतील असे सुतवाज यावेळी मुनगंटीवार यांनी दिले
आज परतुर शहरात माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंढरपूरची यात्रा भरावी असा जनसमुदाय उसळला होता 20 हजार पेक्षा अधिक बंधू भगिनींनी आज लोणीकरांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींसह युवा बांधवांचा जल्लोष बघण्यासारखा होता ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी हाती विराट शक्ती प्रदर्शन करत आज आमदार बबनराव लोणीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी युवा कार्यकर्ते व महिलांच्या घोषणांनी परतुर शहर दणाणून गेले होते प्रसंगी बबनराव लोणीकर पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास रॅलीमध्ये सहभागी असलेल्या नागरिकांनी व्यक्त केला
परतु विधानसभा मतदारसंघात महिला बचत गटाच्या माध्यमातून 1 लाख 10 हजार 720 लाभार्थी महिलांना अर्थशाही उपलब्ध करून देण्यात आले असून त्या माध्यमातून महिलांनी वेगवेगळे व्यवसाय करत खंबीरपणे आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी वारंवार बैठका घेऊन महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आमदार बबनराव लोणीकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते त्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांच्या खात्यात 80 कोटी 4 लाख रुपयांचा निधी जमा झाला असल्याची माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या मनोगतात दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यावर 7500 जमा झाले असून परतून विधानसभा मतदारसंघातील 1 लाख 10 हजार पेक्षा अधिक महिलांचा यामध्ये समावेश आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील यासारख्या मातब्बर नेत्यांनी त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व पक्षांनी या योजनेची खिल्ली उडवली आणि ही योजना बंद पडावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली व ही योजना बंद करावे अशी मागणी देखील केले त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतलेला असताना महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होऊन मिळू नये यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि पक्षातील सर्वांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यामुळे माता भगिनी महाविकास आघाडीला नक्कीच त्यांची जागा दाखवतील असा विश्वास देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि पक्षांनी कितीही आदळ आपण केली तरी लाडकी बहीण योजना कदापि बंद होणार नाही प्रति महिना 1500 रुपयाप्रमाणे आतापर्यंत महिलांच्या खात्यात 7500 रुपये जमा झालेले आहेत यासाठी राज्य सरकारने 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असून जो जोपर्यंत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार सत्तेत आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी आमदार लोणीकरांनी दिले.
पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की मागील पंचवार्षिक मध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब अर्थमंत्री असताना त्यांनी 4700 कोटी रुपयांचा भरगोस निधी परतुर विधानसभा मतदारसंघासाठी दिला होता त्यामुळे परतुर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मला प्रयत्न करता आले यापुढे देखील परतुर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार असून ज्येष्ठ नागरिक महिला माता भगिनी व युवा बांधवांसाठी सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे परतूर मतदारसंघातील तीनशे गावांना डांबरीकरणाचे रस्ते प्रत्येक गावात सिमेंट काँक्रिटीकरण चे रस्ते गावोगाव सांस्कृतिक सभागृह अनेक प्रशासकीय इमारती मागासवर्गीय मुलींसाठी परतुर व मंठा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वस्तीगृह न्यायालयीन इमारती परतुर मंठा येथे भव्य क्रीडा संकुल यासह शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आरोग्याच्या सुविधा उपलब्ध हव्यात यासाठी परतुर व मंठा या दोन्ही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र 33 केव्ही 132 केव्ही 220 केव्ही यासह परतुर विधानसभा मतदारसंघाचा परभणी जिल्ह्याची असणारा संपर्क लक्षात घेता केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून 355 कोटी रुपये किंमत असलेल्या परतूर – वरफळ – चिंचोली – सातोना – सेलू – मानवत रोड रस्त्याच्या कामाला देखील मंजुरी मिळाली असल्याचे लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केले
यावेळी भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर डॉक्टर ओमप्रकाश शेटे बाळासाहेब जाधव प्रवीण सातोणकर भगवान कांबळे विठ्ठलराव बरकुले यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मंदाताई लोणीकर विश्वजीत खरात, अंकुशआबा बोराडे, बाबुराव शहाने, संदीप गोरे, गणेशराव खवणे, सतीशराव निर्वळ, शत्रगुण कणसे, रमेश भापकर पंजाबराव बोराडे, नागेशराव घारे नाथराव काकडे राजेश मोरे, दिपक बोराडे, नरसिंग राठोड, बी डी पवार, प्रवीण सातोनकर, हरीराम माने, रमेश भापकर माणिकराव वाघमारे गीताराम हजारे, दिनेश होलानी, माऊली शेजुळ जिजाबाई जाधव नागेशराव घारे विक्रम उफाड गजानन उफाड जिजाबाई जाधव विकास पालवे रवी सोळंके संपत टकले संभाजी वारे खय्युम पठाण गजानन देशमुख दारासिंग चव्हाण रंगनाथ येवले बंकटराव सोळंके बाबाराव थोरात प्रसादराव गडदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विठ्ठलराव बरकुले गणेशराव घारे शिवसेना शिंदे गटाचे भगवानराव सुरुंग सुदामराव प्रधान शहाजी राक्षे श्रीष्टीचे सरपंच अर्जुन राठोड, तौफिक कुरेशी मुस्तफा पठाण मोहम्मद जमीनदार अजीम पटेल डॉ रियाज रयत क्रांती संघटनेचे गजानन राजबिंडे मधुकर मोरे भगवान कांबळे सर्जेराव जाधव अंकुशराव बोबडे कैलासराव शेळके विलास घोडके भागवत मानवतकर मुस्तफा पठाण प्रियंका खडके जयश्री पवार यमुना दवणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील शिवनगिरीकर यांनी केले