जालना । प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघासाठी उत्तर प्रदेश केडरचे श्री. डॉ. वेदप्रकाश मिश्र (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचे सोमवारी सायंकाळी जालना येथे आगमन झाले आहे. मतदार किंवा राजकीय पक्ष, उमेदवार यांना निवडणूक निरिक्षक श्री. मिश्र यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 84594 71430 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत श्री. मिश्र यांचा मुक्काम येथील शासकीय विश्रामगृह, अंबड चौफूली, जालना, येथे असणार आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, भ्रमणध्वनी क्रमांक 94238 40001 यांची निवडणुक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. लोकप्रतिनीधी, राजकीय पक्षाचे प्रतिनीधी, सामान्य नागरिकांना श्री. मिश्र यांना सकाळी 9 ते 10 या वेळेत शासकीय विश्रामगृह, अंबड चौफूली, जालना येथे भेटता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.