मारवाडी संमेलन व युवा मंचतर्फे शनिवारी सर्वधर्मीय दीपावली स्नेहमिलन व अन्नकुट

19

जालना । प्रतिनिधी – अखिल भारतवर्षीय मारवाडी संमेलन शाखा जालना, मारवाडी युवा मंच जालना आणि महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता रुक्मिणी गार्डन येथे सर्वधर्मीय दीपावली स्नेहमिलन व अन्नकुट उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दीपावली स्नेहमिलनाचे उद्घाटन खा. डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उद्योगपती पन्नालाल बगडिया हे राहणार आहेत तर आशीर्वचन देण्यासाठी पं. मनोज महाराज गौड, पं. सत्यनारायण महाराज व्यास हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी राज्यमंत्री तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, माजी आमदार श्रीमती शकुंतलादेवी शर्मा, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, पोलीस अधीक्षक अजय बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, राष्ट्रीय संघटन मंत्री वीरेंद्र धोका, महाराष्ट्र प्रदेश सभेचे महामंत्री सुदेश करवा, उपाध्यक्ष उमेश पंचारिया, माहेश्वरी सभेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिवनाथ राठी, स्नेहमिलन कार्यक्रमाचे मार्गदर्शक सुरेशबाबू झुनझूनवाला, सतीश अग्रवाल, गोपाल घनश्यामदास गोयल, राजेंद्र भारुका, दिनेश राठी, कैलास लोया, डी. बी. सोनी, विजय कामड, रामप्रसाद भुजंग, समाजसेवी डॉ. जुगलकिशोर भाला, रामकुवर अग्रवाल, नेमीचंद रुणवाल, विप्र फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष रामनिवास गौड, उद्योगपती कैलासचंद्र अग्रवाल, जेपीसी बँकेचे चेअरमन संजय मुथा, जनसेवा ग्रुपचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोतीवाला, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी संमेलनचे प्रवक्ते मनीष तवरावाला, सहमंत्री पवन जोशी, संयुक्त मंत्री लक्ष्मीनारायण मानधना, संघटन मंत्री सुनील राठी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मारवाडी संमेलनचे जिल्हाध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, सचिव सुनील बियानी, कार्याध्यक्ष सीए गोविंदप्रसाद मुंदडा, जालना शहर मारवाडी संमेलनचे अध्यक्ष शरद काबरा, सचिव प्रितेश मालपाणी, कार्याध्यक्ष अरुण अग्रवाल, मारवाडी संमेलनचे माजी शहराध्यक्ष सुरेंद्र चेचानी, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष महेश भक्कड, सचिव पियुष होलानी, कोषाध्यक्ष रमेश मोदी, महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनचे कोषाध्यक्ष नरेंद्र मित्तल, संस्थापक सदस्य घनश्यामदास गोयल, सुरेंद्र पित्ती, अनिल गोयल, विशाल अग्रवाल, कमलबाबू झुनझुनवाला, समीर अग्रवाल, अरुण अग्रवाल, संजय राठी, सूर्यनारायण गजबी, डूंगरसिंह राजपुरोहित, कैलाश लोया, राहुल अग्रवाल, आजीवन सदस्य गौतमसिंग मुनोत, राजेश सोनी, सुखलाल जैन, विष्णुकुमार चेचानी, विजय जैन, सुरेश मुथा, महावीर गेल्डा, राजेश जैन, दिलीपकुमार चेचानी, नंदकिशोर जेथलिया, अनिल सोनी, विजय गिनोडीया, मदनलाल खंडेलवाल, चेतन बोथरा, जगदीश भरतिया, संतोष करवा, महावीर जांगीड, संजय डी. करवा, विष्णू बांगड, सीए नितीन तोतला, गोपाल पालीवाल, पंकज देविदान, नंदकिशोर आर. अग्रवाल, सुनील लाहोटी, सागर सुराणा, सतीश राठी, संजय भरतिया, अल्केश देविदान, विपिन चेचानी, रमेश मोदी, रामेश्वर सोमाणी, सुशील खंडेलवाल, मनोज कर्नावट, संतोष अग्रवाल, पंकज पाटणी, बालाप्रसाद भक्कड, सुरेंद्र मुनोत, नरेंद्र अग्रवाल, बंकटलाल खंडेलवाल, पंकज दरक, मधुर निमोदिया, जयप्रकाश श्रीमाली, राहुल वझे, प्रमोद तोतला, किशोर तिवारी, महेंद्र बाठीया, निखील तायल, आशिष तोष्णीवाल, राजेश कामड आदींनी केले आहे.