परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा सुफडा साफ करा – वडले महाविकास आघाडीचे आसाराम बोराडे यांची उमेदवारी दाखल

14

परतुर । प्रतिनिधी – राज्य व केंद्रातील भाजप सरकारने फसव्या योजना आणून शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना लुटले, जाती-जातीत भांडणे लावणारे हे बेईमान सरकार असून या मतदारसंघातूनच नव्हे तर राज्यातून दळभद्री सरकारचा सुपडा साफ करा असे आवाहन शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी केले. परतुर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांच्या नामांकन अर्ज भरण्याच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी खा. संजय जाधव, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, महाविकास आघाडीचे उमेदवार ए जे बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे, काँग्रेसचे प्रदेश सचिव एड. अन्वर देशमुख, भास्कर आंबेकर, अनिरुद्ध खोतकर, अंकुशराव अवचार, माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड, अशोक आघाव, हरिहर शिंदे, मनीष श्रीवास्तव, जगन्नाथ काकडे, संभाजी खंदारे, दीपक लावणीकर, एड. अविनाश राठोड, अजय अवचार, सुदर्शन सोळंके, बबनराव गणगे, हरिभाऊ चव्हाण, नितीन राठोड, संजय राठोड, बाबाराव राठोड यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. या भव्य रॅलीत महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह परतूर – मंठा – नेर – सेवली भागातील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. रेल्वे स्टेशन भागातून मुख्य रस्ता मार्गे इंदिरा मंगल कार्यालयापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी झालेल्या सभेत महाविकास आघाडीचे शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी भाजपवर कडाडून टीका केली. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला हद्दपार करून सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार ए.जे. बोराडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. यावेळी भास्कर आंबेकर म्हणाले की, भाजपाला या मतदारसंघातून पायउतार करण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात असलेले ए. जे. बोराडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले. अनिरुद्ध खोतकर यांनी श्री बोराडे यांना पक्षाने न्याय दिला असून आता जनतेने विजयाची सूत्रे हाती घ्यावीत असे सांगितले. राष्ट्रवादीचे नेते पंकज बोराडे ज्यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील भाजपवर खडसून टीका केली. एकीकडे लाडक्या बहिणींना पैसे देता आणि दुसरीकडे दाजींकडून महागाईच्या नावावर वसूल करता असा टोला लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार ए जे बोराडे यांनी सांगितले की, मागील 25 ते 30 वर्षापासून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी मतदारसंघात काम करीत आहे, या मतदारसंघातील हुकूमशाहीला, दंडेलशाहीला आणून पाडण्यासाठी माय बाप जनतेने मला आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे नेते एड. अन्वर देशमुख, बाबासाहेब तेलगड, जगन्नाथ काकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बेबीताई पावसे, संतोष शिंदे बाजीराव खरात गौतम सदावर्ते, आबा कदम, प्रदीप ठोके, तुळशीराम कोहिरे, मधुकर पाईकराव यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, परतूर – मंठा – नेर – सेवली भागातील महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.