दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ वाटप नाही; जालना शहरात काँग्रेसचे ‘गाजर दाखवा’ आंदोलन

60

जालना । महाराष्ट्र राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटपाची केलेली घोषणा फसवी निघाल्याचा आरोप करीत रविवारी जालना शहरात काँग्रेस पक्षाच्या जालना जिल्हा सफाई सेलच्या अध्यक्षा सौ. नंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथीयांनी ‘गाजर दाखवा’ आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिकाधारकांना ‘ ‘ ‘ ‘आनंदाचा शिधा’ या उपक्रमाअंतर्गत दिवाळीपूर्वी दिवाळी कीट देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा फसवी निघाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.
शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप न केल्याच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेस कमिटीचे जालना शहराध्यक्ष शेख महेमुद यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जालना जिल्हा सफाई सेलच्या अध्यक्षा सौ. नंदा पवार यांनी तृतीयपंथीयांना सोबत घेऊन रविवारी (ता.२३) जालना शहरातील गांधी चमन येथे’ गाजर दाखवा’ आंदोलन केले. यावेळी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दिवाळीत शिधापत्रिकाधारकांना दिवाळी कीट दिवाळीत वाटप न करणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांचा निषेध करण्यात आला, तसेच उभय अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी यावेळी सौ. नंदा पवार यांनी यावेळी केली.
यावेळी तृतीयपंथी तनुजा पठाण, विद्या पोळ, श्रध्दा पवार, सायबा सय्यद, करूणा वानखेडे, निलो पठाण, नेहा पठाण, जोया पठाण, बिजली काळेबाग आदींची उपस्थिती होती.