जालना । प्रतिनिधी – जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत खो-खो, नेमबाजी, जिम्नॅस्टीकस् खेळाचे प्रशिक्षण सुरू महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राअंतर्गत नियमित खेळाडू प्रशिक्षण शिबीर दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पासून सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय खेळाच्या संघटना, क्रीडा मंडळे, खेळाडु व पालक यांनी सदर नियमित शासनामार्फत चालण्यार्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा. विशेषत: शालेय स्तरावरील राज्यस्तऱ खेळाडु यांनी प्रशिक्षण केंद्रात आवश्य प्रवेश घ्यावा. असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील शालेय, कनिष्ठ़ महाविद्यालयातील नियमित सराव करणारे मुले व मुलींना खेळाचे मुलभुत व अद्यावत प्रशिक्षण देण्यात येणार असून कार्यालयातील शासनाद्वारे नियुक्त़ तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकाद्वारे सकाळ वेळ 6.30 ते 8.30 वा. व सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंतच्या दोन सत्रात मुलभुत कौशल्य व तंत्रशुध्द़ प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच तज्ञ डॉक्ट़र, फिजिओथेरफिस्ट़, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, क्रीडा संघटक खेळाडू प्रशिक्षण कालावधीत खेळाडुंचा गुणवत्तेत वाढ होण्यासाठी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक करणार आहेत.
जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे खो-खो, नेमबाजी ( शुटींग) व जिम्नॅस्टीक्स़ या खेळाचे प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयातील तज्ञ राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे ( खो-खो ) (मो. 7588169493), आशिष जोगदंड (नेमबाजी) (मो. 8888346828), सिध्दार्थ कदम ( जिम्नॅस्टीकस् ) (मो. 9403124007) यांच्याशी संपर्क साधून खेळाच्या खेळाडुंने या नियमीत प्रशिक्षण शिबीरात सहभागी व्हावे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.