बदनापूर: कापुस व तुर लागवड केलेल्या शेतात गांज्याची लागवड करणार्या एकास पोलिसांनी अटक केलीय. बाहदुरसिंग रामप्रसाद महेर रा. खामगाव ता. बदनापुर जि. जालना असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील बाहदुरसिंग मेहर याने खामगाव शिवारातील डोंगरावरील कापुस व तुर लागवड केलेल्या शेतात गांजाची झाडं लावल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली होती. त्या माहिती वरून बदनापुर पोलिसांचं पथक, कृषी अधिकारी आणि बदनापूर पंचायत समिती कार्यालयातील सरकारी पंच यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी बाहदुरसिंग महेर याने आर्थिक फायद्यासाठी शेतामधील कापुस व तुर पिकात 185 गांजाची लहान मोठे झाडे लावल्याचं पथकाला मिळुन आले. त्यावरून पोलिसांनी बाहदुरसिंग महेर यास अटक करून 21 लाख 57 हजार 500 रूपये किंमतीचे 185 झाडं पोलिसांनी जप्त केलेत. या प्रकरणी छऊझड कायद्यानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस अधिक तपास करीत आहेत.