केंद्र व राज्य सरकार कडे पाठपुरावा करत परतूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता गेल्या पाच वर्षात पाचशे कोटी रुपये निधी आणला – आमदार बबनराव लोणीकर

12

परतूर । प्रतिनिधी – अनुसूचित जाती जमाती मधील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने नवीन विहीर रु.5 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्ती रु.1 लाख, शेत तळी प्लास्टिक अस्तरीकरण रु.2 लाख, इनवेल बोअरिंग रु.40 हजार, वीज जोडणी रु.20 हजार, विद्युत पंप संच रु.40 हजार, सोलर पंप रु.50 हजार, पी व्ही सी पाईप रु.50 हजार, तुषर सिंचन संच रु.47 हजार, ठिबक सिंचन संच रु.97 हजार, पारसबाग रु.5 हजार, बैलिचलत ट्रकटर यंत्रसामग्री रु.50 हजार, विंधन विहीर रु.50 हजार अशाप्रकारे अनुदानात भरमसाठ वाढ केली आहे. मुस्लिम समाजाच गेल्या 70 वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस ने वाटोळे करून ठेवल असून मुस्लिम समाज आज ही आर्थिक दृष्टीने मागास आहे. मुस्लिम समाजातील मुला-मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण घेता आलं पाहिजे. राज्यातील व केंद्रातील शासकीय सेवेत त्यांना रुजू होत आला पाहिजे. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. आज परतूर शहरात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या एक कोटी रुपये किमतीच्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद सांस्कृतिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना संजय गांधी योजनेचे 1866 लाभार्थी असून श्रावण बाळ गट अ.व.गट ब. 5729 आहेत. राष्ट्रीय वृद्धापकाळ लाभार्थी 2705. इंदिरा गांधी विधवा लाभार्थी 243. इंदिरा गांधी दिव्यांग 175. संजय गांधी अनुसूचित जाती जमाती 55. श्रावण बाळ अनुसूचित जाती जमाती 55 आभार त्यांना परतूर तहसील कार्यालय अंतर्गत लाभ देण्यात येत होता. 8962 लाभार्थी होते. महाराष्ट्र राज्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सप्टेंबर महिन्यात परतुर तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत 1460 पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती. तर ऑक्टोबर 2024 मध्ये परतुर तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत नव्याने 900 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. अशा एकूण 11322 लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती या वेळी उपस्थित नागरिकांना आमदार लोणीकर यांनी दिली.भगवानराव मोरे, दया काटे महाराज, खय्युम पठाण, नगरसेवक कृष्णा आरगडे, संदीप बाहेकर, प्रवीण सातोणकर, प्रकाश चव्हाण, ऍड. काळे, शेख आबेद, माजद भाई, तुकाराम काळे, अहमद भाई, कोंडीभाऊ पहाडे, राजाभाऊ सोनटक्के, कादर भाई, परमेश्वर सांगुळे, योगेश सांगुळे, बबनराव पवार, अब्दुल रहमान मुज्जू कायमखानी मलिक कुरेशी, एक्का भाई यांच्या सह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.