घनसावंगी । प्रतिनिधी – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ 100 – घनसावंगी विधानसभा मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड, घनसावंगी येथे भेट देवून तेथील विधानसभा निवडणूकीचे नियोजन, गृह मतदान, मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण, पोस्टल बॅलेट मतदान नियोजन, स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्षाची पाहणी केली. तसेच, तहसील कार्यालयातील मतदान प्रक्रियेचा आणि नामनिर्देशन बाबतच्या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला.
त्यावेळी शशिकांत हदगल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जालना, उपविभागीय अधिकारी अंबड तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, श्रीमती योगिता खटावकर, तहसीलदार घनसावंगी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, विजय चव्हाण, तहसीलदार अंबड तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, संतोष इथापे, नायब तहसीलदार घनसावंगी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, समीर जाधव, गटविकास अधिकारी, घनसावंगी, श्रीमती मोनाली सोनावणे, नायब तहसीलदार घनसावंगी, .विवेक उढाण, नायब तहसीलदार, अंबड, धीरज भामरे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, घनसावंगी, विजय पाटील, अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड, रवि जोशी, गटशिक्षणाधिकारी, घनसावंगी, डॉ.सखाराम पवळ, तालूका कृषी अधिकारी, घनसावंगी, श्रीमती मनिषा पैठणे, दुय्यम निबंधक, घनसावंगी, श्री.धर्माधिकारी, नायब तहसीलदार अंबड हे उपस्थित होते.