परतूर । प्रतिनिधी – अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग परतुर अंतर्गत मागील काळातील घडलेल्या गुन्हयामधील समाज कंटकावर, हिस्ट्रीसिटर यांचेवर निवडणूक अंनुषंगाने एक विशेष मोहीम राबवून 102 जनावर प्रतिबंधक कारवाई केली. या कारवाईने समाज कंटकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
परतूर पोलीस स्टेशन हद्दीतील मागील काळातील घडलेल्या गुन्हयामधील समाजकंटक, हिस्ट्रीसिटर यांचेवर कलम 126 बीएनएसएस प्रमाणे 37 समाजा कंटकावर व तसेच कलम 129 बिएनएसएस प्रमाणे आठ जणावर प्रतिबंधक कारवाई केली आहे. तसेच उपविभाग परतूर मधील एकूण 102 समाजाकंटक, हिस्ट्रीसिटर यांचेवर प्रतिबंधक कारवाई परतूर पोलीस स्टेशन येथे अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्वतः उपस्थित राहून केली आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दादाहरी चौरे, पोलिस निरिक्षक एम.टी. सुरवसे, मंठ्याचे पोनि निकाळजे, मौजपुरीचे सपोनि घुगे, आष्टीचे सपोनि सचिन इंगेवाड, सेवलीचे सपोनि खटकळ उपस्थित होते.