टेंभुर्णीच्या नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचा तेजस सोनाळकरची क्रीडा स्पर्धेत तेजस्वी कामगिरी

5

टेंभुर्णी – येथील श्रीमती.जे.बी.के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू विद्यार्थी तेजस सोनाळकर याने नुकत्याच झालेल्या विभागीय स्तरावरील- शालेय सायकलिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून तेजस सोनाळकर याची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर, यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24/10/ 2024.रोजी- छत्रपती संभाजी नगर शेंद्रा येथे झालेल्या विभागीय स्तरावरील-क्रीडा स्पर्धा पार पडल्या , या स्पर्धेत सायकलिंग क्रीडा प्रकारात श्रीमती.जे.बी.के व .नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तेजस सोनाळकर याने चमकदार कामगिरी केली आहे ,त्यामुळे त्याची राज्यस्तरावरील स्पर्धे साठी निवड झाली. त्याच्या या निवडीचे व त्यास मार्गदर्शन करणार्‍या क्रीडा शिक्षक राजे शेवाळे, क्रीडा शिक्षक कैलास भुतेकर, यांचे नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय काबरा, उपाध्यक्ष. जमिर शेख सर, सचिव.सत्यनारायण सोनी, कोषाध्यक्ष सुभाष राठी, ज्येष्ठ संचालक रामनारायण काबरा, ज्येष्ठ संचालक तथा माजी अध्यक्ष सुरेश शेठ काबरा, ज्येष्ठ संचालक तथा माजी सचिव प्रेमसुख काबरा, संचालक तथा माझी सचिव प्रल्हाद टेंभुर्णीकर, संचालक राजीव काबरा, संचालक दीपक काबरा, संचालक मधुकरराव निकम, , संचालक विश्वनाथराव सांगुळे, संचालक तथा उपप्राचार्य प्रा.दत्ताजिराव देशमुख टेंभुर्णीकर, संचालक प्रदिप काबरा, संचालक,प्रदिप मुळे, सर्व संचालक मंडळ तथा प्राचार्य.नंदकुमार काळे, उपमुख्याध्यापक पंजाबराव सोळंके, पर्यवेक्षक धनंजय पुराणे, एस.बी.बोरकर, क्रीडा अधिकारी, तसेच सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकारी श्री. चंद्रशेखर घुगे सर, क्रिडा विभाग प्रमुख कैलास भूतेकर, क्रिडा मार्गदर्शक राजेश शेवाळे,व प्राध्यापक सुनील बनसोडे, प्राध्यापक अरुण आहेर, प्राध्यापक रामदास भांगे, प्राध्यापक कैलास जाधव, प्राध्यापक गजानन धोटे, प्राध्यापक डॉक्टर आनंद जाधव,रमेश इंगळे, विष्णू जाधव,राजेंद्र जगताप, रवींद्र मोरे, दिनकर उखर्डे, दत्ता उखर्डे, भीवसान ससाने, संजय कुलकर्णी, गणेश सावसक्के, आवटी मॅडम, पाटील मॅडम, भिलावेकर मॅडम, कळंबे मॅडम, शेख मॅडम, लंबे मॅडम, राजू डोमळे, नागोराव देशमुख, दगडोबा तांबेकर, दीपक देशमुख,सर्व कॉलेजचे विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन करून तेजस सोनाळकर यास राज्यस्तरीय होणा-या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.