जालना । मराठा समाज मंडळाचे संस्थापक , थोर स्वातंत्र्यसैनिक स्व. रामभाऊजी राऊत यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले .
मंगळवारी (ता.25) बस स्थानकाजवळील पुतळा परिसरात आयोजित अभिवादन सोहळ्यास आर. आर. खडके, जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, विश्वासराव भवर, अंकुशराव देशमुख, राजाभाऊ गाजरे, विठ्ठलराव शिर्के, प्रकाश जगताप, अहिनाथ मोरे, गोविंद गाजरे ,सूर्यकांत पवार, शरद गादिया, मुन्ना गजबी, दिगंबर पेरे, सुरेश गाजरे, राधाकिसन टिळेकर, सदाशिव पवार, शंकर खैरे, सतीश जाधव, रामराव मगर आदींची उपस्थिती होती. यावेळी स्व. रामभाऊजी राऊत यांच्यासोबत केलेल्या कार्याच्या स्मृतींना उपस्थितांनी उजाळा दिला.