जालना । प्रतिनिधी – जालना विधानसभा मतदार संघातील महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे नांव जाहीर होताच आणि त्यांना ए. बी. फॉर्म मिळताच श्री. खोतकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज गुरुवारी (दि. 24) सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी त्यांच्या सोबत 101- जालना विधानसभा मतदारसंघातील युवा नेते संजय खोतकर, युवासेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर. अॅड. सुनील किंगावकर, सौ. दर्शना खोतकर – झोल, सौ. समृद्धी खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, यशराज खोतकर, अभोरे आदींची उपस्थिती होती.
अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म अर्जुनराव खोतकर यांना दिला. यावेळी त्यांच्यासमवेत पुत्र अभिमन्यू खोतकर उपस्थित होते. तत्पूर्वी म्हणजे बुधवारी मुंबई येथे ए. बी फार्म आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी जात असतांना अर्जुनराव खोतकर यांचा बदनापूर विधानसभा शिवसेनेच्या वतीने समृद्धी महामार्गावर अकोला निकळक शिवारात जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वाखाली जंगी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, उपजिल्हाप्रमुख गणेश सुपारकर, माजी नगरसेवक राहुल हिवराळे, मेघराज चौधरी,अल्पसंख्यांक शहर प्रमुख जफर खान, युवा सेना तालुकाप्रमुख ईश्वर पाटील झुंबड, अकोल्याचे सरपंच उपतालुकाप्रमुख महादू गीते, युवा सेना शहर संघटक अमोल दाभाडे ,शहर प्रमुख कैलास खैरे ,सोशल मीडिया तालुकाप्रमुख देवा ढाकणे, सरपंच विलास सावंत, कंडारीचे सरपंच भरत खाडे, रामेश्वर दराडे ,भगवानराव ढाकणे ,कैलास पालवे ,अण्णासाहेब तांबे ,समाधान मुंडे ,शरद गीते ,निवृत्ती राजे ,दत्ता तांबे, कृष्णा ढाकणे, ज्ञानेश्वर दराडे, बालाजी शिंदे यांच्यासह अकोला निकळक, भराडखेडा ,कंडारी, रामखेडा बदनापूर येथील ग्रामस्थ, पदाधिकारी, शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.