सिरसवाडीत काँग्रेसला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

18

जालना । प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिरसवाडी ता. जालना येथील काँग्रेसचे दत्तात्रय सातभाये यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उपनेते, माजी मंत्री, अर्जुनराव खोतकर यांच्या विकासाभिमुख, समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
अर्जुनराव खोतकर यांना काल शिवसेना पक्षातर्फे सलग आठव्यांदा जालना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. दर्शना निवासस्थानी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा जल्लोष सुरू असताना युवा सेनेचे तालुका सरचिटणीस, सिरसवाडीचे युवा नेतृत्व रवींद्र ढगे यांच्या मध्यस्थीने दत्तात्रय सातभाये यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी स्वागत केले.
यावेळी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते ,गणेश सुपारकर ,मेघराज चौधरी, माजी नगरसेवक निखिल पगारे ,विशाल बनकर ,राहुल गवारे , रवींद्र ढगे, बाळासाहेब पाचरणे ,जनार्दन चौधरी, नारायण ढगे, रामभाऊ तांबे ,मनोहर ढगे, कैलास खळेकर, सुरेश तांबे ,ज्ञानेश्वर तांबे ,गजानन ढगे ,अशोक ढगे ,कैलास काजळकर ,रामनाथ काजळकर विलास ठोंबरे ,कैलास ढगे, गणेश हनवते, आदींची उपस्थिती होती.
पदावर नसतांना सुद्धा अर्जुनराव खोतकर यांनी सिरसवाडीला विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले. रवींद्र ढगे यांच्या पाठपुराव्यामुळे वैयक्तिक लाभाच्या विहिरी, गावात अंतर्गत रस्ते ,महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, पाणीपुरवठा योजना , अशी असंख्य विकास कामे करून दाखवली असून गत वेळेस पेक्षा यंदा खोतकर यांना अधिकचे मताधिक्य गावातून देणार असल्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.