जालना । प्रतिनिधी – शहरातील माळीपुरा भागात तलवाल घेऊन दहशत माजविणार्या एका ईसमास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या कडुन एक धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात अवैद्य धारदार शस्त्रे बाळगणारे ईसमांची माहिती घेवुन कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानंतर स्थागुशाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून मंगळवार (दि 22) रोजी ईसम नामे अशरफ उर्फ बाबा ईब्राहीम खान (वय 42, रा. माळीपुरा जुना जालना) हा माळीपुरा भागातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात तलवाल घेऊन फिरत असून लोकांमध्ये दहशत पसरवित आहे. या माहितीवरून संबंधीत ईसमाचा शोध घेतला त्यांच्या ताब्यातून रु दोन हजार रुपये किमतीची धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलीस हेकॉ(1117) आडेप यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोहेकॉ सॅमुअल कांबळे, लक्ष्मीकांत आडेप, रमेश राठोड, सुधीर वाघमारे, सतिष श्रीवास, कैलास चेके आदींनी केली आहे.