शिंदेच्या शिवसेनेचे 45 शिलेदार ठरले; जालन्यातून खोतकर रिंगणात

96

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिदेंच्या नेतृत्वात लढली जाणारी ही पहिली निवडणूक असून आता शिवसेनेने आता 45 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकतं 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप केले होते. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी आता 45 उमेदवार जाहीर केले आहेत. शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. जालना विधानसभा मतदार संघातून माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर यांना रिंगणात उतरवले आहे. शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी 1. एकनाथ शिंदे – कोपची पाचपाखाडी, 2. साक्री – मंजुळा गावीत, 3. चोपडा – चंद्रकांत सोनवणे, 4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, 5. पाचोरा – किशोर पाटील, 6. एरंडोल – अमोल पाटील, 7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, 8. बुलढाणा – संजय गायकवाड, 9. मेहकर – संजय रायमुलकर, 10.दर्यापूर – अभिजीत अडसूळ 11. आशिष जयस्वाल – रामटेक, 12. भंडारा – नरेंद्र भोंडेकर, 13. दिग्रस – संजय राठोड, 14. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, 15.कळमनुरी – संतोष बांगर, 16. जालना – अर्जुन खोतकर, 17.सिल्लोड – अब्दुल सत्तार, 18.छ संभाजीनगर मध्य – प्रदीप जयस्वाल, 19. छ. संभाजीनगर पश्चिम – संजय सिरसाट, 20. पैठण – रमेश भूमरे, 21.वैजापूर – रमेश बोरनारे, 22.नांदगाव – सुहास कांदे, 23. मालेगाव बाह्य – दादाजी भूसे, 24. ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक, 25. मागाठाणे – प्रकाश सुर्वे, 26. जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर, 27. चांदिवली – दिलीप लांडे, 28. कुर्ला – मंगेश कुडाळकर, 29. माहीम – सदा सरवणकर, 30. भायखळा – यामिनी जाधव, 31. कर्जत महेंद्र थोरवे, 32. अलिबाग – महेंद्र दळवी, 33. महाड – भरत गोगावले, 34. उमरगा – ज्ञानराज चौगुले, 35. सांगोला – शहाजीबापू पाटील, 36. कोरेगाव – महेश शिंदे, 37. परांडा – तानाजी सावंत, 38. पाटण – शंभूराज देसाई, 39. दापोली – योगेश कदम, 40. रत्नागिरी – उदय सामंत, 41. राजापूर – किरण सामंत, 42. सावंतवाडी – दीपक केसरकर, 43. राधानगरी – प्रकाश आबिटकर, 44. करवीर – चंद्रदीप नरके, 45. खानापूर – सुहास बाबर,