परतूर विधानसभा मतदारसंघात विविध आवास योजनेत 14784 घरकुलासाठी 199 कोटी रुपयांच्या निधी आमदार बबनराव लोणीकर यांचे विशेष प्रयत्न

4

परतूर । प्रतिनिधी – परतूर तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय (60 कोटी रु), वाटूर, आष्टी, श्रीष्टी व सातोना येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी (24 कोटी 88 लाख) असा एकूण 84 कोटी 88 लक्ष रु निधी मंजूर तर मंठा तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय (60 कोटी), दहिफळ खंदारे व ढोकसाळ या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी (12 कोटी 44 लक्ष), तर खोराड सावंगी व उस्वद प्राथमिक आरोग्य उपकेंद्रसाठी (1 कोटी 10 लाख) असे एकूण 73 कोटी 54 लक्ष रु मंजूर, मतदारसंघात 2 उपजिल्हा रुग्णालयासाठी 120 कोटी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 37 कोटी 32 लाख तर 2 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी 1 कोटी 10 लाख रुपये असा एकूण 157 कोटी 42 लक्ष रुपयांचा निधी मंजूर आपण केंद्र सरकार च्या आरोग्य मंत्रालयाकडून मंजूर करून आणला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. सातोना व श्रीष्टी जिल्हा परिषद सर्कल मधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका आज सातोना व दैठणा या ठिकाणी संपन्न झाल्या याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते. या वेळी पुढे बोलतांना परतूर विधानसभा मतदारसंघात शेगाव पंढरपूर दिंडी महामार्ग या सह प्रमुख राज्य मार्ग महामार्ग जिल्हा मार्ग गावा गावाला जोडणारे रस्ते, प्रत्येक रस्त्यावर पूल, गावागावातील तांडे वाड्या वस्त्यावरील पाणंद रस्ते परतुर शहरातील उड्डाणपूल, स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वातानुकूलित नाट्यगृह, वंदनीय विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह तालुका व जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारती, क्रीडा संकुल, गावा गावात 24 तास वीज उपलब्ध होण्यासाठी नवीन पोल व डिप्या करीता आणी मतदार संघाच्या सर्वांगीन विकासासाठी आपण केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात सात हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून आणला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. मुख्यमंत्री लडकी बहीण योजना, दिव्यांग बांधवांच्या योजना, मुख्यमंत्री लाडकी लेक योजना, सावित्रीबाई फुले स्वातंत्र्य स्वयं योजना, अनाथ बालकांच्या योजना आशा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यभरात राबविलेल्या शेकडो योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता आपण परतूर मंठा जालना या तहसील कार्यालया सह जिल्हा अधिकारी जालना यांच्या दालनात आढावा बैठक घेऊन परतुर मंठा वनेर सेवली सर्कल मध्ये भव्य जनजागृती मेळावा व कॅम्पचे आयोजन केले होते यातून मतदारसंघातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून. मोदी आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर आवास योजना या विविध योजनेच्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघातील पंचवीस हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती यावेळी आमदार बबनराव लोणीकर आपल्या भाषणात म्हणाले.
या प्रसंगी सातोना येथे भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव राहुलभय्या लोणीकर, परतूर विधानसभा प्रभारी निरीक्षक माजी आमदार संजय दिंडे, विलासभाऊ आकात, परमेश्वरनाना आकात, निवृत्तीआप्पा लाटे, संपतराव टकले, नगरसेवक शिवराज जाधव, रोहनभैया आकात, बंडु मानवतकर, रेंगे पाटील, सरपंच विकास खरात, बबनदादा आकात, पैलवान विलास आकात, बाबासाहेब आकात, अक्षयभैया आकात, आबा आकात, अशोकराव खंदारे, शिवाजीदादा घनवट, परमेश्वर लाटे, सुधाकर बेरगुडे, भगवानराव आकात, विठ्ठलराव बिडवे, नारायण बिडवे, गोपाळराव बिडवे, नामदेवतात्या आकात, सय्यद अली, अशोक दांगट. सर्जेराव मानवतकर. ओमजी साठे, प्रकाश चव्हाण, नामदेव मानवतकर. रामप्रसाद गाढवे, नदीम सरपंच. गोपाल गोरे. राहुल काळे, विलास मोठे, युसुफ भाई यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी टोकवाडी तालुका मंठा येथील पश्चिम तांडा व टोकवाडी येथील दलित आघाडी पदाधिकार्‍यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून व आनंद जाधव जनार्धन वायाळ सोनाजी जाधव कृष्णा जाधव भगवान लहाने यांच्या पुढाकाराने अनेक युवकांनी व जेष्ठ नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला प्रवेशामध्ये टोकवाडी गावचे उपसरपंच मल्हारी प्रधान विकास राठोड विनोद आढे नारायण आढे अंबादास राठोड बाळू राठोड राजेश राठोड संतोष राठोड सुरेश राठोड जानकीराम राठोड गुलाब आढे, भाऊराव राठोड संजय राठोड भारत राठोड संपत चव्हाण ज्ञानेश्वर राठोड राहुल कांबळे अशोक चव्हाण बाबासाहेब प्रधान महादेव प्रधान विशाल प्रधान भीमराव चव्हाण तुळशीराम प्रधान विकास कांबळे राजेश जाधव अशा असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
तर श्रीष्टी सर्कल मधील दैठना येथील कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव राहुलभय्या लोणीकर, परतूर विधानसभा प्रभारी निरीक्षक माजी आमदार संजय दिंडे, शिवराज जाधव शत्रुघन कणसे संपत टकले बद्री भाऊ ढवळे रमेश भापकर रवी सोळंके संभाजी वारे अंकुशराव नवल किरण अंभोरे संभाजी खवल रमेशराव आढाव अंगत शेरे अरुण जगदाळे नारायणराव सोळुंके सदाशिव खवल संभाजी शिंदे शामराव चव्हाण लक्ष्मण दादा शिंदे महादेवराव बरकुले मुंजाजी झरेकर सदाशिवराव गोरे दत्ताभाऊ धुमाळ गोरख गाडगे भरत अंभोरे राजेंद्र खानापुरे गंगाधर बापू सुरंग अनिल भापकर सतीश गाडगे नितीन जोगदंड सखाराम भापकर विठ्ठल सस्ते विष्णू खालापुरे नामदेव शिखरे राजाभाऊ खालापुरे पुंजाराम खालापूरे कुंडलिकराव वटाणे गणेशराव खवल भीमराव साळवे कैलास साळवे सौरव मुंडे भगवान रोडगे परमेश्वर शेरे गणपत शिंदे सर्जेराव जाधव किसनराव आघाव विष्णू बरकुले पांडुरंग खरात दत्ता राव धुमाळ दत्ताभाऊ रायकर भरत रायकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.