जालना । प्रतिनिधी – ब्राह्मण समाजातील होतकरू आणि गरजू युबक, युवतीना आपला छोटा मोठा व्यवसाय उद्योग उभारणीसाठी राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून प्राथमिक तरतूद म्हणून 50 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. भविष्यात हा निधी एक हजारकोटींवर नेण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्चासन जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिले.
स्व. विलास नाईक प्रतिष्ठानच्या वतीने रविवार (दि 20) रोजी स्वयंवर मंगल कार्यालयात भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी समाजातील ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा आणि उपोषण केली त्या सर्व संघर्ष योद्धांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सोहळव्यासाठी भास्कर महाराज देशपाड़े (नबनाथ संस्थान, जाफराबाद), ह.भ.प.विश्वास महाराज गोंदीकर (प्रसिद्ध भागवतकार,जालना), ह.भ.प. रामदास महाराज आचार्य (श्रीराम मंदिर संस्थान, जालना) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी परशुराम आर्थिक महामंडळ मिळावे म्हणून मराठवाड्यातील संघर्ष योध्ये म्हणून पदूदेवा जोशी – पालमकर (पालम, परभर्णी), अविनाश जोशी (पालम,परभणी), बाजीराव धर्माधिकारी (परळी, बीड), विश्वजीत देशपाडे(पुणे), सचिन वाढे पाटील ( छत्रपती संभाजीनगर) केदार पाटील(छत्रपती संभाजीनगर), प्रसाद खारकर (सेलू, परभणी), निखिललातूरकर (नांदेड), अनिल मुळे (छत्रपत्ती संभाजीनगर), सुरेश देशपांडे(छत्रपती संभाजीनगर), आर. बी. शर्मा (छत्रपती संभाजीनगर),विलास अकोलकर (छत्रपती संभाजीनगर), उमेश जोशी (परभरणी),सुरेश मुळे (जालना), विजया कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर),विजया अवस्थी (छत्रपती संभाजीनगर), शाम कुलकर्णी (गंगाखेड,परभणी), प्रकाश केदारे (पाथरी, परभणी), डॉ. संजय सुपेकर(गंगाखेड, परभणी), शैलेश कुलकर्णी (अंबेजोगाई, बीड), वसंत किनगावकर (छत्रपती संभाजीनगर), लक्ष्मीकांत दडके (पाथरी,परभणी), संतोष कुलकर्णी (परभणी), अॅड.प्रसाद देशमुख (बीड),भानुदास शौचे (नाशिक), रामनिवास गौड यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी स्व.विलास नाईक प्रतिष्ठानच्या भारती नाईक व श्रेया नाईक यांचा सत्कार रसना देहेडकर व रमेश देहेडकर यांनी केला.
महामंडळासाठी भविष्यात एक हजार कोटींची तरतूद करू – खोतकर
जालन्यातून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनकरण्यासाठी सर्वात अगोदर प्रयत्न झाले, त्यामुळे हा आपण हा मुद्दा विधानसभेत मांडला त्या वेळी महामंडळाचे बीज रोवले होते. आता त्याला मंजुरी मिळन अंकर फुटलेआहेत. भविष्यात या महामंडळासाठी भरीवी अशी तरतूद करून ती जवळपास एक हज़ारकोटीच्या आसपास नेऊ अशी ग्वाही माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिली. तसेच संघर्ष योद्धांचे स्वागत केले.
आ.कैलास गोरट्याल यांनी भरिव तरतूद न झाल्याची व्यक्त केली ंखंत
समाजाच्या आर्थिक महामंडळची स्थापना झाली ही बाब या समाजासाठी निश्चित सकारात्मक म्हणावी लागेल, परंतु भरीव तरतुद करणे आवश्यक होते ती केली नाही. ती खंत कायम असून राज्यात महाविकास आधाडीचे सरकार आल्यास या महामंडळासाठी अधिकचा निधी देण्यासह महामडळाच्याअध्यक्षपदी जालन्यातील समाजबांधवाला आपण संधी देऊ यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही गोरंट्याल यांनी दिली. पद्मशाली समजल देखील विनकर महामंडळाकरिता शंभर कोटी रुपये दिले आहेत, असल्याचे तसेच खोतकरांचे नाव न घेता सर्व कामे केली आपण केली असल्याचे श्रेय अनेक जण श्रेय घेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
ब्राह्मण समाज हा पूर्वीपासून प्रमाणिक,नम्र आणि विनयशीलआहे. मार्गदर्शकाच्या भूमिकेतच तो नेहमी राहिलेला आहे. त्याच्याकड़ेअसलेली व बुद्धी या भूमिका जोरावर त्याने मार्गदर्शकाची बजावण्याची परंपरा जपली आहे.भविष्यातही नव्या पिढीनेही परंपरा आणि सनातन वैदिक धर्माचे रक्षण तसेच त्याच्यावृद्धीसाठी झोकून देऊन काम करणेगरजेचे असल्याचे प्रसिद्ध भागवतकार विश्वासमहाराज गोंदीकर यांनी यावेळीनमूद केले.
ब्राह्मण समाज हा गरिबीतच जगला आहे. काही बोटावरमोजता येतील एवढा लोकांनी उच्च शिक्षण घेऊन मोठी शहरे आणि वेगवेगळ्या प्रातांत त्यांचे नाव उज्वल केले आहे.कुठल्याही क्षेत्रात आपला समाज मागे नाही. अनेकजण गरिबीतूनही उदरनिर्वाह भागवत असले तरी त्यांनी स्वाभिमान सोडलेला नाही. हे आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्याने गरजू आणि होतकरूना निश्चितपण आर्थिक मदत मिळून त्यांची प्रगती होईल हा विश्चास जाफराबाद येथील नवनाथ संस्थानचे मठाधिपती भास्कर महाराज देशपांडे यांनी व्यक्त केला.
समाजाच्या सर्वागीण प्रगतीमध्ये ब्राह्यण समाजाने निश्चितच मोठावाटा उचलेला आहे. आपले अनेकमित्र याच समाजातील असुून संकट काळातत्यांनी आम्हाला मोठी मदत केली आहे.हा समाज अल्प संख्याकअसला तरी सर्वाना सोबत घेऊन चालतो.एकूणच या आर्थिक विकास महामंडळामुळेया समाजातील गरिबांना न्याय मिळेल असे सांगून परपरा जपतानाच हा समाज तेव्हढाच परिवर्तशील असून या समाजाला मोठा गौरवशाली इतिहास असल्याचे माजी आ.अरविंद चव्हाण यांनी सांगितले.
परशुरामआर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी ज्या ज्या संघर्ष योद्धांनी मदत केली. त्यांचे कौतुकच केलेपाहिजे. ब्राह्मण समाज नेहमीच प्रामाणिक आणि विनयशीलता असल्याबाबतओळखलाजातो.
आगामी काळात आपण यमहामंडळाला अधिकची तरतूद कशीकरून घेता येईल यासाठी पाठपुरावा करू असे आश्चासन देऊन योद्वांचा सत्कार हा उपक्रम स्तुत्य असल्याचे भाजपाचे विधानसभा प्रमुख भास्करदानवे यांनी आपल्या भाषणातूनसांगितले.
यावेळी समाजातील बहुसंख्य ब्रह्मवृंद उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ड.सुनील किनगावकर,रमेश देहेडकर,रवींद्र देशपांडे,भगवान पुराणिक,सतीश अकोलकर,रमण उपाध्ये,सुरेंद्र न्यायाधीश, सुहास सदावर्ते यांनी प्रयत्न केले आभार प्रदर्शन श्रेयानाईक यांनी केले