जालना । प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणूकीच्या अचारसंहीताच्या पार्श्वभूमीवर तसेच सण उत्सवादरम्यान शहरात अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोमवार (दि 21) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील मुख्य मार्गावरून रॅपिड अॅक्शन फोर्स पोलीसांकडून रुट मार्च म्हणजेच पथसंचलन करण्यात आले.
या पथसंचलनाला चंदनझीरा पोलिस ठाण्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर ठाणे हद्दीतील सुंदर नगर, एकता चौक, अशोक चौक, हनुमान मंदिर, महात्मा ज्योतीबा फुले चौक, मौलाना आझाद चौक असे मार्गक्रमण करुन चंदनझिरा चौक इंद्रायणी हॉटेल येथे समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये दंगा नियंत्रण पथक, एसआरपीएफचे जवान, चंदनझीरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, उपनिरिक्षक सचिन सानप यांच्यासह ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता.