ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रिती

अभिवादन: स्वा. सै. रामभाऊ राऊत यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक उपक्रम

52

जालना । मराठवाडा मुक्ती संग्रामातील अग्रगण्य स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी,कामगार, गोर-गरीब, मजूर, यांना आधारवड राहिलेले स्व. रामभाऊ राऊत यांच्या 36 व्या पुण्यतिथी निमित्त राऊत परिवाराच्या वतीने नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांना थंडीपासून संरक्षणासाठी उबदार चादर वाटपासह सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
मंगळवारी ( ता. 25) बस स्थानकाजवळील पुतळा परिसरात आयोजित अभिवादन सोहळ्यास शिवसेना उपनेते,माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भास्करराव आंबेकर, भास्करराव दानवे, बबलू चौधरी, राजेंद्र राख,अंकुशराव देशमुख, आर. आर. खडके, अशोक पांगारकर,अतिक खान, सिध्दीविनायक मुळे,भाऊसाहेब घुगे, ॲड. दीपक कोल्हे, हेमंत ठक्कर, पंडित भुतेकर,रामेश्वर भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, विष्णू पाचफुले,प्रा. राजेंद्र भोसले, अकबर इनामदार, कपिल दहेकर, धनराज काबलिये, गोवर्धन कोल्हे, बाबासाहेब कोलते, यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी स्मृतीस उजाळा देतांना जालना शहरात मराठी माणसाला सन्मान मिळवून देण्यासाठी स्वा. सै .रामभाऊ राऊत यांनी कष्ट घेतले, संघर्ष केला. जालना जिल्हा निर्मितीसाठी दिलेले योगदान आपण पाहिले असून आजही स्व. आप्पांमुळे मनात ताकद निर्माण होते. असे नमूद करत त्यांचा वारसा जतन करणाऱ्या राऊत कुटुंबाविषयी आदर आणि अभिमान असल्याचे खोतकर यांनी सांगितले.
भास्करराव आंबेकर म्हणाले,उपेक्षितांना आधाराची गरज म्हणून स्वा. सै. रामभाऊ राऊत यांनी सत्ता, पैशास महत्त्व न देता नेतृत्व केले. असे सांगून त्यांचा स्मरणार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे गरजवंतांना जगण्याची उमेद मिळत असून तरूण पिढी समोर आदर्श असल्याचे आंबेकर यांनी नमूद केले.
भास्करराव दानवे यांनी
इतिहासात नोंद होईल अशी स्व. रामभाऊ राऊत यांची कारकीर्द मार्गदर्शक ठरणारी असून दुर्लक्षित घटकांना आधार देऊन समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. असे दानवे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात आयोजक राजेश राऊत यांनी वंचित, उपेक्षित घटकांना आसरा देण्यासह शेतकऱ्यांवर होणारी दादागिरी स्वा. सै. रामभाऊ राऊत यांनी मोडून काढली. त्यांच्या सेवेचा वारसा घेऊन पतसंस्था, व्यायामशाळा, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उभे करण्याचे काम राऊत परिवारातर्फे सुरू असल्याचे राजेश राऊत यांनी स्पष्ट केले.
बबलू चौधरी,राजेंद्र राख, अशोक पांगारकर, ॲड. दीपक कोल्हे, यांची समायोचित भाषणे झाली. सुञसंचालन संजय देठे यांनी केले तर ॲड.अर्जुन राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास संयोजक राजेश राऊत, जालना मर्चंट को- ऑप. बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, गटनेते गणेश राऊत , मनसेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत, वामनराव राऊत, तान्हाजी राऊत, विजय राऊत, अमोल राऊत, सुरेश राऊत, सुधीर राऊत, सचिन राऊत, सतीश जाधव, सागर देवकर, रोहित चव्हाण ,संजय बोबडे, गणेश भोसले, रुपेश जैस्वाल, शांतीलाल राऊत,सतीश बाभळे, सुशील पारेख, मनोज गुळवे, नवीन पटेल, विनोद पटेल, विश्वासराव भवर, ज्ञानदेव सोळुंके, विठ्ठलराव शिर्के, ओमप्रकाश भिसे, सुरेश गाजरे, रमेश शिंदे,प्रकाश जगताप , मुन्ना गजबी,सतीश संचेती, शुभम टेकाळे ,नरेश जैस्वाल, किरण गरड, स्वच्छता निरीक्षक पंडित पवार, अरुण वानखेडे, विलास गावंडे,प्रभाकर बोर्डे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

राजकीय भिंतीची नेत्यांना जाणीव…!

राजकीय मतभेद,गटा- गटांमुळे दुरावलेले जूने मिञ, सहकारी, कुटुंबासोबत माणसा- माणसांत विभागणी झाली, याची कबुली नेत्यांनी या वेळी जाहीररित्या दिली.स्व. रामभाऊ राऊत, स्व. शंकरराव राख यांच्यात वैचारिक मतभेद असले तरी ते सर्व एकत्रपणे विचार मंथन करायचे हल्ली तसे नाही. असे सांगून राजेंद्र राख यांनी मधल्या फळीतील कार्यकर्त्यांची घुसमट मांडली. तोच धागा पकडून भास्करराव आंबेकर यांनी चाळीस वर्षे सोबत काम केलेल्या अर्जुनराव खोतकर यांच्या सारखी जीवाभावाची माणस विभागली, मनास पिळवटून टाकणारा प्रसंग ओढावला अशी खंत व्यक्त केली. तर माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी राजकारणाची भिंत मने तोडणारी असून या मुळे अनेक घरे रसातळास जात असल्याचे सांगून यंदा प्रथमच आपण भास्करराव आंबेकर यांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या नाही. अशी प्रांजळ कबुली अर्जुनराव खोतकर यांनी दिली.