मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता गेल्या पाच वर्षात सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला – लोणीकर

4

मंठा । प्रतिनिधी – परतूर विधानसभा मतदारसंघात शेगाव पंढरपूर दिंडी महामार्ग या सह प्रमुख राज्य मार्ग महामार्ग जिल्हा मार्ग गावा गावाला जोडणारे रस्ते, प्रत्येक रस्त्यावर पूल, गावागावातील तांडे वाड्या वस्त्यावरील पाणंद रस्ते परतुर शहरातील उड्डाणपूल, स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वातानुकूलित नाट्यगृह, वंदनीय विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह तालुका व जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारती, क्रीडा संकुल, गावा गावात 24 तास वीज उपलब्ध होण्यासाठी नवीन पोल व डिप्या करीता आणी मतदार संघाच्या सर्वांगीन विकासासाठी आपण केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात सात हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून आणला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. कोकेश्वरी मंगल कार्यालय कोकरसा ता.मंठा जि.जालना येथे दिनांक 21 ऑक्टोबर 2024 सोमवारी भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित तळणी व जयपूर या दोन जिल्हा परिषद सर्कल मधील कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मुख्यमंत्री लडकी बहीण योजना, दिव्यांग बांधवांच्या योजना, मुख्यमंत्री लाडकी लेक योजना, सावित्रीबाई फुले स्वातंत्र्य स्वयं योजना, अनाथ बालकांच्या योजना आशा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यभरात राबविलेल्या शेकडो योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता आपण परतूर मंठा जालना या तहसील कार्यालया सह जिल्हा अधिकारी जालना यांच्या दालनात आढावा बैठक घेऊन परतुर मंठा वनेर सेवली सर्कल मध्ये भव्य जनजागृती मेळावा व कॅम्पचे आयोजन केले होते यातून मतदारसंघातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून. मोदी आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर आवास योजना या विविध योजनेच्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघातील पंचवीस हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी आवर्जून दिली. या प्रसंगी भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, गणेशराव खवने सतीश निरवळ संदीप गोरे नाथाभाऊ काकडे नारायण काकडे विठ्ठलमामा काळे राजेश मोरे सुरेशबापू बाहेकर विलास घोडके विवेक काकडे गजानन देशमुख मनोज देशमुख तारासिंग चव्हाण नितीन सरकटे शरद पाटील रामेश्वर देशमुख भगवान देशमुख रामकिशन बोडखे नवनाथ खंदारे नवनाथ चट्टे आबासाहेब सरकटे दारासिंग चव्हाण सुभाष लाड शिवशंकर डोईफोडे बाजीराव आघाव प्रकाश गबाळे अजय जाधव भागवत देशमुख सचिन राठोड केशव येऊल दत्तराव कांगणे दिपक दवणे अशोक राठोड किशोर हनवते राहुल बाहेकर कैलास चव्हाण शंकर बांडगे गजानन शिंदे अरुण खवणे नारायण काकडे सुभाष चव्हाण जगन टकले संजय टकले नितीन चाटे आत्माराम राठोड भास्कर जाधव सिद्धेश्वर सरकटे गणेश दवणे सुंदरराव दवणे निवास देशमुख यांच्या सह हजारो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.