परतुर । प्रतिनिधी – परतुर-मंठा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे बुध कमिटी प्रशिक्षण 359 बुध करिता आयोजित करण्यात आले होते. बुध कमिटीच्या प्रशिक्षणाला तालुक्यातील बुथ कमिटी पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते .या वेळी बुथ कमिटीला संबोधित करताना प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा म्हणाले की तुम्ही सुरेश जेथलिया यांना आमदार बनवा मंत्रीपद देण्याची जिम्मेदारी मी घेतो.उ मेदवारीबद्धल कुठलाही संभ्रम मनामध्ये बाळगू नका. परतूर विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षच लढावणार असून तनमण धनाने कामाला लागा असे सुचक वक्तव्य प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा यांनी बुथ प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना त्यांनी प्रतिपादन केले, या वेळी प्रशिक्षणाला सुरेश जेथलिया, बालासाहेब देशमुख, नितीन जेथलिया, विशाल तौर, बाबाजी गाडगे, बाळासाहेब अंभिरे, इंद्रजीत घनवट, लक्ष्मण शिंदे, मंजुळदास सोळंके, बाबुराव हिवाळे, रहेमु कुरेशी, सादेक खतीब, राजु भुजबळ, अण्णासाहेब खंदारे, माऊली वायाळ, सुरेश सवणे, पांडू कुरधने, मंजुळदास सोळंके, सिद्धू सोळंके, पंजाब देशमुख, प्रफुल्ल शिंदे, हाजी रहमत खान, सादिक जागीरदार, अजीम कुरेशी, अविनाश शहाणे, आंबेकर, सिद्धू अंभोरे, अमीर पठाण, हाशमी महिला असंघटित कामगार काँग्रेस ता.अ. सारीका सरवणकर, अलका कोळे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष परतुर आदी पदाधिकारी कार्यकर्ता मोठया संख्येने उपस्थित होते.