जालना । प्रतिनिधी – निवडुन येतील तेथे उमेदवार द्यायचा, एसी-एसटीत आपल्या विचारांच्या उमेदवाराला मतं द्यायची व जेथे आपला उमेदवार नाही तेथे तो उमेदवार मराठा समाजाच्या मागण्यांना पाठींबा देईल त्या उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभा करायची असे म्हणत ज्यांनी मराठ्यांना संपवलं त्यांना संपवायचंच त्यांना सोडायचे नाहीच असे मनोज जरांगे पाटील यांनी येथे म्हटले आहे. विशेष म्हणजे जर समीकरण जमले नाही तर सर्व उमेदवार पाडायचे, कार्यक्रमच लावायचा अशी घोषणा या ठिकाणाहून मनोज जरांगे यांनी केली.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. या समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी उपोषण-आंदोलनेही केली.
मात्र, राज्य सरकारने यावर ठोस निर्णय घेतलेला नाही. त्याताच निवडणुका घोषीत झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेत घोषणा केली.
या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची मते जाणून घेतली. ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येथील केवळ त्याच ठिकाणी उमेदवार द्यायचे, तसेच जो मतदार संघ राखीव असेल त्या ठिकाणी आपल्या विचारांचा मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो तरीही त्या उमेदवाराला मदत करुन त्यांच्या पाठीशी समाजाची ताकद उभा करायची, राखीव मतदार संघात आपला उमेदवार उभा करायचा नाही. या ठिकाणीच्या उमेदवारांकडून 500 रुपयांच्या बाँण्डवर आपल्याला पाठींबा देत असल्याबाबत लिहून घेण्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
तसेच ज्या मतदार संघात मुस्लीम, एससी, एसटी एकत्र आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तुम्ही तोपर्यंत उमेदवार अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशीपर्यंत आपण निर्णय घेऊ, ज्याला कोणाला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सांगितले जाईल त्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा, मात्र, जर उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा सांगितल्यानंतरही ज्यांने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यांने इतरांकडून काही घेतले हे समजून त्यांचा नाद सोडायचा त्यांला कितीही फिरू द्या त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. आपण निवडणुन येणार्या उमेदवारांचे अर्ज ठेवू, त्यापुर्वी मी सर्व समाज घटकांशी चर्चा करुन समिकरण जुळविण्याचा प्रयत्न करतो, जर समिकरणे जुळली तर विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवू अशी घोषणा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. मात्र, त्यांची मागणी सरकारने मान्य न केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता.
तसेच सत्ताधार्यांचे आमदार निवडणुकीत पाडणार असल्याचाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आज अखेर मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीत मराठा समाजाला हात वर करुन निवडणुकीमध्ये उमेदवार उतरायचे की नाही? असे विचारत त्यांची मते जाणून घेतली आणि त्यानंतर उमेदवार निवडणुकीत उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.